• Sun. May 4th, 2025

डोकं खाली पाय वर…

Byjantaadmin

Mar 10, 2023
‘डोकं खाली पाय वर”
लातूर शहरांमध्ये ठीक ठिकाणी कचरा पेटवण्यात येतोय, प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही त्यांच्याद्वारे कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी
 ‘डोकं खाली पाय वर” करत अनोख्या पद्धतीने कचरा जाळण्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. शहरामध्ये प्रदूषणाची पातळी वाढली आहे.या सगळ्या प्रकारांने त्रस्त होऊन ग्रीन लातुर वृक्ष टीमने  निषेध केला आहे .अनेकांना कचरा न पेटवण्याबद्दल सांगितले असता मनावर घेतले जात नाही. लोकांची नजर चुकवून, दुसऱ्यांना खूप चांगले तत्त्वज्ञान शिकून, आम्हाला काही कायदा माहित नाही काय, काम करायचं ते करायचं आणि कचरा पेटवल्यानंतर तुम्ही ओरडायचं असे काही चित्र समाजात पाहायला मिळते.
 पण या कचऱ्याच्या पेठ घेण्याने निसर्गावर किती मोठी हानी होते याचा सर्वस्वी विचार केला जात नाही.कचरा जाळल्याने हवा प्रदूषण होते म्हणून पर्यावरण कायद्यानुसार हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. याशिवाय भारतीय दंड विधानातील कलम २७८ नुसार धोकादायक कृत्य म्हणूनही हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. याशिवाय उपद्रवी कृत्य म्हणून कलम २६८, पाण्याजवळ कचरा पेटविला असेल तर कलम २७७ तसेच कलम २६९ नुसारसुद्धा कचरा पेटविणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते.घनकचरा व्यवस्थापन अधिनियम नुसार कोणताही कचरा पालापाचोळा जाळण्यासाठी बंदी घातलेली आहे.कचरा जाळल्याने अनेक विषारी वायू, धूर वातावरणात पसरत आहेत. यापासून कर्करोग, यकृताचे आजार, मलावरोध, अस्थमा, श्वसनावरोध, मेंदूविकार होण्याची दाट शक्यता आहे. फोम कप्स, अंडय़ाचे ट्रे जाळल्याने निघणारा स्टायरिन वायू त्वचा आणि फुफ्फुसांवर वाईट परिणाम करणारा ठरत आहे. कचरा जाळल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे संवेदनशील श्वसन यंत्रणेवर विशेषत: लहान मुलांच्या श्वसनावर विपरीत परिणाम होतो. त्वचा काळवंडणे, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळणे याचा त्रास होतो. डॉक्झिनमुळे गर्भवती महिला, मुले आणि वृद्धांचे आरोग्य खालावू शकते.
 शक्यतो कोणताही कचरा असेल तर तो जाळला जाऊ नये याची काळजी प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घ्यायला हवी. असे आवाहन ग्रीन लातूर वृक्ष टीम तर्फे डॉ. पवन लड्डा यांनी केले आहे.प्लास्टिकचा कचरा असेल तर तो स्थानिक प्रशासनाकडे घंटागाड्यामध्ये द्यावा.व इतर पालापाचोळा असलेला कचरा असेल तर तो एक गठ्ठा करून ठेवावे कालांतराने त्याचे आपोआप खत निर्माण होते.
https://jantaexpress.co.in/?p=4924

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *