बनावट कागदपत्रावरून दिलेल्या बांधकाम परवानगीच्या अधिकाऱ्यांवर व भामट्या विकासकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. .!
(भिवंडी – प्रतिनिधी -नागेश निमकर)भिवंडी एमएमआरडीए हद्दीतील मौजे राहनाळ येथील सर्व्हे क्रं. १३१ धारक सेंट्रल रेल्वे जमिन मिळकतीत अनाधिकृत बांधकाम होत असल्याने तसेच भिवंडी महानगरपालिका डिपी रिमार्कमधील रिंगरोड या आरक्षणाला बाधा येत असल्यामुळे संपुर्ण भिवंडीच्या विकासाचे या बांधकामामुळे दुर्दशा होत असलेबाबत. वरिष्ठ नियोजक एमएमआरडीए (भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्र) ठाणे यांच्याकडील मौजे राहनाळ सर्व्हे क्रं. १३१ (धारक सेंट्रल रेल्वे
असतांना) तेजस सावला व हिमांशु सावला यांना दिलेली बेकायदेशीर बांधकाम परवानगी. मौजे-राहनाळ सदर ईमारत बांधण्यापुर्वी जागेवरून कुठलेही रोडरस्त्याचे डिपी सेंक्शन नव्हता अथवा त्यावेळेच्या एमएमआरडीए च्या नकाशाप्रमाणे ०.२ एफएसआय मंजुर होते आणि सदर एफएसआयचे मंजुरी हे जिल्हाधिकारी बिनशेती परवानगीनुसार जिल्हाधिकारीच्या स्वाक्षरीने होत असे, त्यावेळेला एमएमआरडीएला परवानगी देण्याचे कुठलेही अधिकार नव्हते आणि संदर्भातील त्यावेळेचे विकासक धिरजलाल सावला व चंदुलाल सावला यांनी सदर जमिनीवरती हरिधारा कॉम्प्लेक्स बनवून तो संपुर्ण कॉम्प्लेक्समधील सर्व गाळ्यांचे विक्री केलेले आहे आणि आता त्या कॉम्प्लेक्सवरुन ४ वर्षापुर्वी एमएमआरडीएचा प्लॅन रिवाईज झाल्यानंतर सदर कॉम्प्लेक्सवरून रस्ता फिरवलेला आहे, यापध्दतीने एमएमआरडीए व या भामट्या विकासकांनी हातमिळवणी करून गाळेधारकांची घोर फसवणुक केलेली आहे. गाळेधारकांना फसवलेले आहे. याप्रमाणे एनएमआरडीए व भामटे विकासक यांच्याविरुध्द क्रिमीनल अॅक्ट ४६४, ४६५, ४६५, ४६७, ४६८, ४७१ प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच बनावट कागदपत्र देऊन अनाधिकृत बांधकाम करुन शासनाची फसवणुक केल्याने एमआरटीपी ३७ अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात यावा, कारण या भामटे विकासकांनी जो सातबारा वापरलेला आहे तो सातबारा व त्याचे संपुर्ण क्षेत्र हरिधारा कॉम्प्लेक्स मध्ये वापरून झालेले आहे, परत तोच सातबारा व टायटल हे बाजुच्या सेंट्रल रेल्वेच्या जमिनीमध्ये दाखवुन एमएमआरडीए कडून परवानगी मिळवलेली आहे. एमएमआरडीएने हरिधारा कॉम्प्लेक्सला पुर्वीची जिल्हाधिकारी यांनी दिलेले बिनशेती परवानगी व लेआऊट प्लॅन, मोजणी नकाशा वेगळा सादर केला असुन त्यावरून जिल्हाधिकारी यांनी बिनशेती परवानगी पुर्वी दिलेली होती, परंतु आता जेव्हा वरील संदर्भान्चये असलेले परवानगीचे विकासक श्री. सावता बंधु यांनी सेंट्रल रेल्वेच्या जागेमध्ये भामटेगिरी करून हरिधारा कॉम्प्लेक्सला विकलेला सातबारा हा सेंट्रल रेल्वे मध्ये जागेमध्ये दाखवुन एमएमआरडीए कडुन बनावटरीत्या परवानगी घेतलेली आहे. शासनस्तरावरती सखोल चौकशी करून झालेल्या बनावटगिरीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे व झालेल्या अनाधिकृत बांधकाम तात्काळ निष्कासनाची कार्रवाई करण्यात यावी तसेच सदर अनाधिकृत बांधकामाबाबत अनेक लोकांनी वेगवेगळ्या पध्दतीने तक्रारी करुनही सर्व तक्रारींना फाट्यावर मारलेले आहे आणि एमएमआरडीएच्या रिवाईज प्लॅनमध्ये राहनाल सव्र्हे क्र. १३१ मधुन जो रस्ता फिरवलेला आहे. त्यामुळे मुळ मोकळी जागा सोडून हरिधारा कॉम्प्लेक्ससह अजुफाटयावरील अनेक गरीब लोकांचे पाचशे झोपावरून तो रस्ता दाखविल्यामुळे या सर्व लोकांना या एका भामट्या विकासकाने व भ्रष्ट अधिकाऱ्यांने मिळुन या तेथे राहणान्या व्यावसायिकांना व जनतेला देशोधडीला लावण्याचा प्लॅन आखलेला आहे. जनतेला रोडवर आणण्याचा मानस यांनी आखलेला आहे. त्यामुळे सदरचे बांधकाम तात्काळ वरिष्ठ लेबलवर जमिनदोस्त करण्यात यावे आणि बनावट कागदपत्रावरून दिलेल्या बांधकाम परवानगीच्या अधिकाऱ्यांवर व भामट्या विकासकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा