बीड, 09 मार्च : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. सवंग लोकप्रियता मिळवण्याच्या अनुषंगाने फक्त घोषणाबाजी करणारा अर्थसंकल्प आहे. मुळात बाबा आयेंगे बकरा काटेंगे. बोटी हमको, हड्डी तुमको असा सगळा कार्यक्रम सुरू आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खिल्ली उडवली आहेफक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि लोकप्रियता मिळवण्याच्या अनुषंगाने फक्त घोषणाबाजी करणारा अर्थसंकल्प आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली त्या बीडमध्ये बोलत होत्या.
‘अर्थसंकल्प या अधिवेशनात पहिले पाच दिवस तर शिमगाच करण्याचा कार्यक्रम सत्ताधारी यांच्याकडून सुरू होता. दूरगामी परिणाम करणारा धोरणात्मक आराखडा सांगणारा अर्थ संकल्प नाही. जर शिंदेंचा अर्थसंकल्प सर्वोत्कृष्ट आहे तर फडणवीस यांना अर्थसंकल्प मांडता आला नाही का फडवणीस साहेब अपयशी ठरले का? असा सवाल अंधारेंनी विचारला.
‘दूरगामी परिणाम करणारे राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून अनुकूल परिणाम म्हणजे रोड मॅप टाकायचा असतो. धोरणात्मक आराखडा असा आराखडा करण्यापेक्षा लोकप्रियतेकडे झुकणारे निर्णय एकनाथ शिंदे साहेबांकडून सुरू आहेत. त्याचाच हा परिपाक आहे. हे सगळं करण्यापेक्षा ज्या एसटी कामगारांसाठी विरोधी बाकावर बसून आंदोलन केले होते. त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारांचे काय झालं याच्यावरती जरा विचार करावा आणि शिक्षकांच्या आंदोलनाचा काय झालं ? असा प्रश्न उपस्थित केला.
सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी या घोषणाबाजी आहेत. धोरणात्मक रोड मॅप म्हणून काय केलं यावरती बोललं पाहिजे? शेतकऱ्यांच्या कापूस कांदा यांना भाव नाही तर गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची देखील अद्यापपर्यंत मदत मिळाले नाही बाबा आयेंगे बकरा काटेंगे, बोटी हमको हड्डी तुमको असा सगळा कार्यक्रम सुरू आहे, असं म्हणत टीका केली.