शिवछत्रपती विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
लातूर : लातूर शहरातील कन्हेरी रोड, मोरे नगर परिसरातील शिवछत्रपती विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव सौ. मनिषा गोपे या होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. कांचन जाधव या उपस्थित होत्या. यावेळी विद्यालयाच्या वतीने सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. कांचन जाधव यांच्या हस्ते शाळेतील सर्व शिक्षिका , माता पालक व विद्यार्थिनींचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आपले विचार व्यक्त करताना डॉ. कांचन जाधव यांनी महिलांनी सशक्त होणे काळाची गरज असल्याचे सांगितले. मातांचे आरोग्य व किशोरवयीन मुलींच्या समस्यांवरही त्यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले. यावेळी श्रीमती बावगे, कोळपे, शहाणे या सहशिक्षिकांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवडे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन कळसे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष गोविंदराव गोपे , मुख्याध्यापक श्रीपती व्यवहारे, वाघमारे, क्षीरसागर, कलशेट्टी, जाधव, बोलके, गायकवाड, पटनुरे , साळुंके, दिनेश पवार, प्रियंका जाधव, चांदुरे , शितल कांबळे यांची उपस्थिती होती.
————————
शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली़. विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा, पालापाचोळा व वाळलेल्या झाडांच्या फांद्या होळीसाठी जमा करून परिसर स्वच्छ केला़. संस्थाध्यक्ष गोविंदराव गोपे व *संस्था सचिव मनिषाताई गोपे यांनी होळीचे विधिवत पूजन केले. यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला़. मुख्याध्यापक श्रीपती व्यवहारे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली.
शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शालेय परिसरातील कचरा, पाला-पाचोळा, वाळलेल्या झाडांच्या फांद्या* होळीसाठी जमा करून परिसर स्वच्छ केला व *पर्यावरणाला* व *निसर्गाला* कोणत्याही प्रकारची हानी होऊ न देता होळी साजरी केली़. यावेळी *निसर्गाची कोणत्याही प्रकारची हानी आमच्याकडून होणार नाही,* अशी प्रतिज्ञा केली़. सदरच्या कार्यक्रमास *शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी* उपस्थित होते़. शाळेमध्ये होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुलांना *होळी* सणाची माहिती व महत्त्व सांगण्यात आले .तसेच मुलांना *पाणीबचतीचा* संदेश देण्यात आला़.