• Sun. May 4th, 2025

वाढदिवस विशेष:सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देणार युवा लोकप्रिय नेतृत्व अरविंद भैय्या

Byjantaadmin

Mar 9, 2023

सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देणार युवा लोकप्रिय नेतृत्व

प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते. राजकारणामध्ये एखाद नेतृत्व जेव्हा घडत असत तेव्हा त्याच्या पाठीमागे प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती, सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला उभे करण्याची भावना कायम मनामध्ये ठेऊन कार्य करत राहणे हेच नेतृत्वगुण अंगिकारलेले लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय युवा नेते, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव आदरणीय अरविंदभैय्या पाटील निलंगेकर यांचा उद्या वाढदिवस…
उत्तम संघटन कौशल्य आणि शिस्तबद्ध नियोजनाच्या बाबतीत आवर्जून ज्यांचा उल्लेख केला जातो ते नेतृत्व म्हणजे अरविंदभैय्या… केवळ जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने वेगळे स्थान निर्माण करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि लातूर जिल्ह्याचे यशस्वी माजी पालकमंत्री आदरणीय संभाजीभैय्या पाटील निलंगेकर यांच्या उक्ती आणि कृतीचा वारसा जपत, त्यांचे विचार पुढे घेऊन जाणारे युवा नेतृत्व अरविंदभैय्या आज भारतीय जनता पार्टीचा मुख्य पाया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुथ प्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुख या रचनेमध्ये महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून उत्कृष्ट कार्य पार पाडत आहेत.
आदरणीय संभाजीभैय्या निलंगा विधानसभेच प्रतिनिधित्व जरी करत असले तरी त्यांचे लक्ष संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात आणि विकासकामामध्ये राहण्यासाठी त्यांना भक्कम पाठबळ देणारे अर्जुनरुपी ढाल म्हणून अरविंदभैय्या यांच्याकडे पाहिलं जात. कुठलाही मोठा कार्यक्रम असो किंवा मोठ्या सभेच नियोजन असो भैय्या आपल्या कार्यशैलीच्या माध्यमातून शेवटपर्यंत तो कसा यशस्वी होईल यासाठी आपल्या कडक शैलीचा आवर्जून वापर करतात. मागील काळामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये अटल आरोग्य शिबीर आयोजित केले होते. या शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णांना योग्य लाभ व्हावा आणि हे शिबीर यशस्वी होण्यासाठी अरविंदभैय्या यांनी केलेली मेहनत जिल्ह्यातील प्रत्येक युवा कार्यकर्त्यांनी अनुभवलेली आहे. आज आक्का फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये होत असलेल्या विविध सामाजिक कार्यातुन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत अरविंदभैय्या यांच्या नेतृत्वामध्ये विविध उपक्रम राबविले जातात.
प्रसन्न, तेजस्वी, प्रेमळ व्यक्तिमत्व असलेले अरविंदभैय्या एक एक कार्यकर्ता पार्टीशी कसा जोडला जाईल आणि जोडलेला प्रत्येक कार्यकर्ता कसा टिकला पाहिजे यासाठीच धडपड करत असतात. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ओळख ठेवणारे, त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणाऱ्या युवा लोकप्रिय नेत्याचा उद्या वाढदिवस. आई रेणुकादेवी आदरणीय भैय्यासाहेबांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचे नेतृत्व संबंध महाराष्ट्रामध्ये असेच फुलत राहो आणि त्यांना उत्तम, निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच मनःपूर्वक प्रार्थना…

आदरणीय भैय्यासाहेबांना वाढदिवसाच्या खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा

विजय होगले
जनसेवा संपर्क कार्यालय निलंगा

(Advt.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *