राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्कारासाठी
लातूर येथील संगीता मोळवणे यांची निवड
जागतिक महिला दिनानिमित्त मिमांसा फाउंडेशन दै. समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप व मीडिया पोलीस सोशल क्लब नांदेडच्या वतीने देण्यात येणारा राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्कारासाठी लातूर येथील संगीता मोळवणे यांची निवड करण्यात आली आहे.
मिमांसा फाउंडेशन दै. समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप व मीडिया पोलीस सोशल क्लबच्या नांदेडच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी सामाजिक कार्यासह विविध क्षेत्रात चांगले विधायक कार्य करणाऱ्या महिलांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येत यावर्षी लातूर येथील संगीता मोळवणे यांची राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली त्यांनी लातूर शहरात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.