मुंबई : अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाचा गौतम अदानी आणि अदानी समूहावर महिनाभर दिसून आला. हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानींच्या कंपन्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. न्यूयॉर्क स्थित शॉर्ट सेलर कंपनीने अदानीवर स्टॉक मॅनिप्युलेशन आणि शेअर्सच्या किंमती ओव्हरड्यू असल्याचा आरोप केला. दरम्यान, आता अदानी ग्रुप हिंडेनबर्गमुळे झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. कर्ज भरून काढण्यासह मुदतपूर्व पेटत आणि रोड शो यांसारखी पावले उचलली जात आहेत. गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यात गुंतलेल्या अदानी समूहाच्या शेअर्समध्येही जोखीम घटक कमी होताना दिसत आहेत.
मार्च महिना अदानी समूहासाठी आतापर्यंत दिलासा देणारा ठरत आहे. अदानीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत असून अदानीचे बहुतांश शेअर्स दुहेरी अंकी नफा नोंदवत आहेत. शेअर्सच्या वाढीमुळे गेल्या सात दिवसांत अदानी समूहाच्या मार्केट कॅपने २ लाख कोटींवर झेप घेतली आहे. बाजारात शेअर्सच्या तेजीत फक्त गौतम अदानीच नव्हे तर अदानी ग्रुपमधील गुंतवणूकदारही हात धुवून घेत आहेत.
७ दिवसात सुसाट कमाई
अदानीच्या शेअर्समधील रिकव्हरीनंतर गौतम अदानी यांची एकूण संपत्ती वाढत असताना फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर इंडेक्सनुसार २७ फेब्रुवारीपर्यंत, अदानीची एकूण संपत्ती $३३.७ अब्ज होती, जी गेल्या सात दिवसांत वेगाने वाढली आणि $४४.९ अब्ज झाली आहे. शेअर्समधील या वेगवान वाढीमुळे गौतम अडणींनी जगातील श्रीमंतांच्या यादीतही मुसंडी मारली आहे. गेल्या ७ दिवसांत अदानींच्या संपत्तीत ११.५ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ९,४०,८२,८८,००,००० रुपयांची भर पडली आहे.
अदानी शेअर्समधील वाढ
अदानी समूहाला अमेरिकास्थित गुंतवणूक बुटीक GQG कंपनीकडून मोठी गुंतवणूक मिळाली असून या नंतर अदानींच्या शेअर्समध्ये तेजीने वाटचाल पाहायला मिळत आहे. २७ फेब्रुवारी रोजी अदानी समूहाचे मार्केट कॅप ६.८२ लाख कोटी इतके होते, तर गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये पुनरागमन केले आणि ६ मार्च रोजी अदानीचे मार्केट कॅप ८.८५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. म्हणजेच शेअर्समधील तेजीमुळे अदानींचे बाजार भांडवल दोन लाख कोटींनी वाढले आहे.
दरम्यान, अदानी शेअर्समधील तेजीचा फायदा गुंतवणूकदारांही झाला आहे. भारतीय आयुर्विता महामंडळाचे (एलआयसी) शेअर्सही वाढले, तर एसबीआयचे शेअर्स सोमवारी ०.५४ टक्क्यांनी वधारले. लक्षात घ्या कण अदानी ग्रुपमध्ये एलआयसी आणि एसबीआयची मोठी गुंतवणूक आहे. अदानी समूहात नवीन गुंतवणूक करणारे GQG संस्थापक राजीव जैन यांनाही फायदा झाला. २ मार्च रोजी GQG कंपनीने अदानी समूहात १५ हजार ४४६ कोटींचे गुंतवणूक केली, अशाप्रकारे तीन दिवसांत त्यांचे ४,२४७ कोटी रुपये झाले.