चार्टर्ड अकाउंटंट लातूर शाखेच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध उपक्रम
लातूर/प्रतिनिधी:इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस् ऑफ इंडिया न्यू दिल्लीच्या लातूर शाखेच्या वतीने महिला दिनानिमित्त वंडर वुमन्स वीक मध्ये विविध उपक्रम साजरे करण्यात आले. यानिमित्त दि.४ व ५ मार्च रोजी योगा,मेडिटेशन घेण्यात आले. सर्व सीए महिला सदस्य व विद्यार्थिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.सौ. गांधाली वारद यांनी योगाचे मार्गदर्शन केले.मेडिटेशनसाठी सीए विद्यावती वंगे यांनी मार्गदर्शन केले.डॉ.अपूर्वा चेपुरे यांनी महिलांचे मानसिक आरोग्य यासंदर्भात मार्गदर्शन केले.मोफत आरोग्य शिबिरासाठी स्त्रीरोगतज्ञ डॉ.लक्ष्मी देशमुख,त्वचारोगतज्ञ डॉ.मंजरी कुलकर्णी,नेत्ररोगतज्ञ डॉ.सत्यकला गरड,आयुर्वेदतज्ञ डॉ.प्रीती गोजमगुंडे यांनी योगदान दिले.या कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनी व सीए सदस्य उपस्थित होते.
शाखेचे नूतन अध्यक्ष सीए विश्वास जाधव,उपाध्यक्ष सीए राहुल धरणे,सचिव सीए महेश तोष्णीवाल,कोषाध्यक्ष सीए निलेश बजाज तसेच विद्यार्थी संघटना अध्यक्ष सीए एकनाथ धर्माधिकारी व पूर्व अध्यक्ष तथा सदस्य सीए द्वारकादास भुतडा, शाखा प्रभारी सुमित ठाकूर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.