मातंग समाजाला वर्गवारीनुसार आरक्षण देण्याचा प्रश्न विधानसभेत मांडल्याबद्दल सकल मातंग समाज शिष्टमंडळाने मानले आभार
लातूर प्रतिनिधी: महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू असून या अधिवेशनात मातंग समाजाला वर्गवारीनुसार अ,ब,क,ड आरक्षण देण्यात यावे,
यासंबंधीचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करून मातंग समाजाला न्याय मिळवून दिल्याबद्दल मंगळवार दि. ७ मार्च रोजी बाभळगाव निवासस्थानी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांची सकल मातंग समाज लातूर शिष्टमंडळाने भेट घेऊन आभार मानले.
यावेळी लातूर शहरात लहुजी वस्ताद यांचा पुतळा उभारणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील पुतळा परिसराचे सुशोभीकरण करणे, वाचनालय उभारणे, लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा आदी मातंग समाजाच्या विविध विषयावर चर्चा करून समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्याची ग्वाही आमदार अमित विलासराव देशमुख त्यांनी शिष्टमंडळाला दिली. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अशोक देडे, माजी उपमहापौर कैलास कांबळे, मोहन सुरवसे विकास कांबळे, आनंद वैरागे, राज क्षिरसागर, कैलास मस्के, प्रवीण भोसले, जीए गायकवाड, अनिल शिंदे आदीसह मातंग समाज बांधव उपस्थित होते.