• Fri. May 2nd, 2025

पंतप्रधान मोदींना पोस्टाद्वारे कांदे भेट म्हणून पाठवले, नगरमधील शेतकऱ्यांची गांधीगिरी

Byjantaadmin

Mar 7, 2023

कांद्याचे भाव  घसरल्याने शेतकरी  संकटात सापडलेला असल्याने ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे, आंदोलन करत आहेत. सरकारने कांद्याचा हमीभाव, निर्यात धोरण बदलावे ही मागणी घेऊन अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी संघटना आणि शेतकरी विकास मंडळाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांना पोस्टामार्फत कांदे भेट म्हणून पाठवले आहेत. गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांनी गांधीगिरी केली आहे. सोबतच जर शासनाला कांद्याला भाव देता येत नसेल ते शेतकऱ्यांना रोटाव्हेटर घेण्यासाठी अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याला एक रुपयापासून सहा रुपयांपर्यंत कांदा विकावा लागत आहे.

उद्विग्न शेतकऱ्याकडून कांद्याची होळी

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील मातुलठाण गावातील कांदा उत्पादक शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी कांद्याला भाव मिळत नसल्याने उद्विग्न होऊन आपल्या शेतात कांद्याची होळी केली.  तळहातावरील फोडाप्रमाणे कांदा पीक जपलं, वाढवलं आज त्याच हातांनी शेतकऱ्याने काल दीड एकरवरील कांदा पिकाची होळी करुन सरकारच्या निषेधार्थ अग्निडाग आंदोलन केले. कांद्याची होळी करण्यासाठी आणि यातून सरकारविरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी निम्याहून अधिक गाव लोटला होता., प्रत्येकाच्या भावना एकसारख्या होत्या, त्यामुळे लहान मुले, बाया बापडे सारेच मनावर दगड ठेवून कांद्याला अग्नी देत होते. जणू घरातली एखाद्या व्यक्तीचे निधन झाले आशा भावनेने एकीकडे डोळ्यांतून अश्रूंना वेगळी वाट करुन देत होते.

नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी होत आहे हा विश्वास निर्माण करण्यात सरकारला अपयश आलं आहे. त्यामुळे नाफेडसह केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला जात आहे. त्याचबरोबर कांद्याला हमीभाव द्या आणि नुकसान भरुन काढण्यासाठी अनुदान द्या ही मागणी केली जात आहे.

शेतकऱ्यांची थट्टा

अहमदनगरच्या बाजारपेठेत एका शेतकऱ्याच्या कांद्याला दोन रुपये किलोचा भाव मिळाला. 17 गोण्या कांदा विकल्यानंतर त्याच्या हाती केवळ एक रुपया पडला. बीडच्या आष्टी तालुक्यातील बावी येथील शेतकऱ्याच्या बाबतीत घडले आहे. नामदेव लटपटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. असाच प्रकार सोलापुरात घडला होता. सोलापूर बाजार समितीमध्ये (Solapur Market Committee) 10 पोती कांद्यांची विक्री केल्यावर शेतकऱ्याला फक्त दोन रुपये मिळाले. ते पैसेही चेक स्वरुपात देण्यात आले. राजेंद्र तुकाराम चव्हाण असं या शेतकऱ्याचे नाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *