बोतिकोव्ह यांची त्यांच्या घरात पट्ट्याने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.

गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अॅण्ड मॅथमॅटिक्स’मध्ये काम करणारे वरिष्ठ शास्त्रज्ञ बोतिकोव्ह (४७) गुरुवारी त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले, असे वृत्त येथील वृत्तसंस्थेने रशियाच्या तपास समितीच्या हवाल्याने दिले आहे. बोतिकोव्ह हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. २०२०मध्ये स्पुटनिक व्ही लस विकसित करणाऱ्या १८ शास्त्रज्ञांपैकी एक ते होते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २०२१मध्ये करोना लशीवरील कामासाठी बोतिकोव्ह यांचा ‘ऑर्डर ऑफ मेरिट फॉर द फादरलँड’ पुरस्कार देऊन सन्मान केला होता.
रशियन तपासयंत्रणांनी संशयित तरुणाला कोर्टात हजर केले असता त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याला कोर्टाने २ मेपर्यंत ताब्यात ठेवण्याचा आदेश दिला आहे. आरोपी हा २९ वर्षांचा असून त्याच्यानावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, आरोपीचे आणि बोतिकोव्ह यांचे एका चर्चेच्या वेळी वादा-वादी झाली आणि भांडणादरम्यान तरुणाने त्यांचा पट्ट्याने गळा आवळला आणि पळ काढला, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.