निलंग्याच्या माणसाचा हात कोणी पकडू शकत नाही -माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर
निलंगा (प्रतिनिधी) निलंग्याच्या मातीत पाण्यात असा गुण आहे की तो माणूस जिद्द चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर अशक्य ते काम शक्य करून दाखवतो त्यामुळे निलंग्याच्या माणसाचा हात कोणी धरू नये अशी प्रतिपादन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली 5 मार्च रोजी निलंगा येथील वृंदावन मंगल कार्यालयात बजाज अलायन्स जीवन विमा कंपनी लिमिटेड या कंपनीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पत्रकार सुधीर रामदासी यांना अमेरिकेचा एम डी आर डी 2022 अवार्ड मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर बोलत होते यावेळी गणेश रामदासी जेष्ठ पत्रकार प्रदीप नणदकर माजी जि, प अध्यक्ष पंडितराव धुमाळ बजाज अलायन्स चे यशवर्धन देवरस पंकज राऊत, शंकर कौशल्य, सुदाम नारायणपुरे आदी प्रमुख उपस्थित होते, पुढे बोलताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले सुधीर रामदासी यांची ओळख एक सकारात्मक पत्रकार म्हणून होती, परंतु त्यांनी इन्शुरन्स सारख्या वेगळ्या क्षेत्रात जाऊन आपल्या कामाचा एक ठसा उमटविला आहे इन्शुरन्स क्षेत्र हे दुसऱ्याला सुरक्षित करण्याचे व स्वतः पेक्षा याचा फायदा खऱ्या अर्थाने दुसऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला होतो,म्हणूनच सुधीर रामदासी यांनी समाजहिताचे आणि सत्कर्माचे क्षेत्र निवडले असून आपल्या माणसाच्या प्रगतीसाठी आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आव्हान शेवटी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले
कार्यक्रमास शहरातील व्यपारी, शिक्षक, डॉक्टर, वकील,राजकिय मंडळी, आणि पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांनी केले तर प्रास्ताविक, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक गणेश रामदासी यांनी केले