भारतीय जनता पक्ष शेतकरी विरोधी आहे. जेव्हा शेतकऱ्यांचा हाती पीक येते, तेव्हाच आयात शुल्कात कमी करून मोठ्या प्रमाणावर आयात करतात आणि शेतकऱ्यांना दर नाही मिळाला पाहिजे, यांच्या व्यापारी मित्रांना फायदा झाला पाहिजे, असे यांचे धोरण असते, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
आज सकाळी नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सध्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडलेला आहे. त्याला कीड लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. कापूस, तूर, धान, कांदा या सर्व पिकांवर आघात करण्याचे काम भाजप करत आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्येच आम्ही असे ठरवले आहे की जे जे भाजपच्या विरोधात लढायला तयार असतील, त्या सर्वांना आम्ही सोबत घेऊ.
भाजपने लोकशाही व्यवस्था धोक्यात आणली आहे. न्यायव्यवस्था आणि प्रशासनामध्ये त्यांचा हस्तक्षेप आहे. राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आणि मांडलेली आहे. त्यामुळे भाजप विरोधातल्या सर्व लोकांना, राष्ट्रीय पक्षांना सोबत घेऊन देशाचे संविधान आणि देश वाचवण्यासाठी काँग्रेसने भूमिका घेतलेलीच आहे. जे जे या विचाराने सोबत येतील, त्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याची काँग्रेसची भूमिका आहे.
शहरांची नावे बदलवल्याने शेतकऱ्यांचा फायदा, बेरोजगारांचा फायदा महागाई कमी होत असेल, तर सर्व शहरांची नावे बदला. मात्र मानवी गरजांकडे दुर्लक्ष करून हिंदू-मुस्लिम वाद पेटवण्याचे केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण आहे. महाविकास आघाडी म्हणून निवडणुका एकत्रित लढणार आहात आणि प्रचार सभाही एकत्रित घेणार का, या प्रश्नावर पटोले म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून आम्ही जेव्हा काम करतो आहे. तेव्हा भाजप लोकशाहीमध्ये जी क्रूरता निर्माण करत आहे, त्या विरोधात एकत्रित लढण्यास आमचा कोणालाही विरोध नाही, असे nana patole म्हणाले.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याकडून ऊस तोडणी यंत्र वाटप योजना जाहीर