संतोषजी, श्रेयसाठीची केविलवाणी धडपड आता बस्स करा….
स्वतःचे सरकार असताना औसा तालुक्यासाठी अडीच रुपये निधीही आणता आला नाही.त्यांची श्रेयासाठी केविलवाणी धडपड –
भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव यांचा प्रसिद्धपञकाव्दारे सवाल
औसा – औसा विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार अभिमन्यू पवार साहेबांच्या पाठपुराव्यातून काल मतदारसंघातील ३ रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. निधी प्रयत्नांची पराकाष्ठा करून पवार साहेबांनी आणला काही दिड शहाणे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना बनून श्रेय घेण्यासाठी केविलवाणी धडपड करत आहेत, राज्यात २.५ (अडीच वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे सरकार होते, तेंव्हा औसा मतदारसंघासाठी २.५ (अडीच रुपये निधीही आणू न शकणारे आज श्रेयासाठी करत असलेली धडपड पाहून हसावे की रडावे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.असा आरोप भाजपचे औसा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव यांनी केले आहेत.
३० जून ला राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार आल्यापासून पवार साहेबांच्या प्रयत्नातून औसा मतदारसंघातून विकासाची गंगा पुन्हा खळाळून वाहू लागली आहे. पवार साहेबांनी मागच्या ८ महिन्यात सातत्यपूर्ण पाठपुरावा करून जवळपास २५० कोटींचा निधी वेगवेगळ्या रस्त्यांसाठी मंजूर करून आणला आहे. लोदगा-गोंद्री हासेगाव- हिप्परसोगा ते कातपूर या रस्त्यासह इतर २ रस्त्यांना काल जो निधी मंजूर झाला आहे त्यासाठी सुद्धा आ.अभिमन्यू पवार सप्टेंबर महिन्यांपासून पाठपुरावा करत होते. ऑक्टोबर महिन्यात त्यांनीच हे रस्ते प्रस्तावित केले होते, त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री मा ना गिरीश महाजन साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुद्धा पवार साहेबांनी याच रस्त्यांसाठी आग्रह धरल्याने मंजुरी देण्यात आली आणि काल प्रशासकीय मंजुरीचे आदेश निर्गमित झाले.
मागच्या ८ महिन्यात तुमचे खासदार ना मुख्यमंत्र्यांना एकदा जाऊन भेटले, ना उपमुख्यमंत्र्यांना, ना ग्रामविकास मंत्र्यांना आणि नाही सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना भेटले. मग निधी काय घरी बसून आराम करता करता आणला काय? जेंव्हा काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील कामे तांत्रिक अडचणीत अडकवली होती, जेव्हा तुमच्या सरकारने औसा मतदारसंघातील पुरहाणी दुरुस्ती, कार्यक्रमाला सुद्धा निधी डावलला होता तेंव्हा तुम्ही आणि तुमचे खासदार कुठल्या बिळात लपून बसला होतात? औसा मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे, विकासासाठी कोण प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि कोण श्रेय लाटण्याची केविलवाणी धडपड करत आहे हे त्यांना चांगले कळते.संतोषजी, ज्या हासेगाव जिल्हा परिषद सर्कलमधील निवडणुकीवर डोळा ठेऊन श्रेयासाठी तुम्ही केविलवाणी धडपड केलीय ना, त्याच हासेगाव सर्कलमधील जनतेच्या नजरेत तुमची केविलवाणी धडपड हास्यास्पद ठरलीय. ‘जो माणूस निवडणुकीपूर्वी बनवेगिरी करून उघडपणे दुसऱ्याच्या कामाचे काय बनवेगिरी करेल’ असा प्रश्न आता हासेगाव सर्कलमधील जनतेला पडला असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव यांनी उपस्थित केला आहे..