• Thu. May 1st, 2025

अमिताभ बच्चन शूटिंगदरम्यान जखमी:हैदराबादेत ‘प्रोजेक्ट K’ ची शूटिंग सुरू होती

Byjantaadmin

Mar 6, 2023

चित्रपट अभिनेते बीग बी अमिताभ बच्चन हैदराबाद येथे शूटिंगदरम्यान जखमी झालेत. त्यांनी स्वतःच आपल्या ब्लॉगवर याची माहिती दिली आहे. ते सध्या मुंबईतील आपल्या घरी आराम करत आहेत. अमिताभ बच्चन हे प्रभासच्या ‘प्रोजेक्ट K’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्यात एक अ‍ॅक्शन सीन करताना त्यांच्या बरगड्यांना इजा झाली. हैदराबादेतील उपचारानंतर त्यांना मुंबईला पाठवण्यात आले आहे.

अमिताभ बच्चन आपल्या ब्लॉगमध्ये म्हणाले – बरगडीच्या पिंजऱ्यातील स्नायू फाटले आहेत. शूटिंग रद्द करण्यात आली आहे. पट्टी बांधली असून, उपचार सुरू आहेत. खूप जास्त वेदना होत आहेत. हलण्यासही त्रास होत आहे. श्वास घेण्यासही त्रास होत आहे. या वेदना कमी करण्यासाठी मला काही औषधी देण्यात आलीत. यातून सावरण्यासाठी आणखी काही आठवडे लागतील.

अमिताभ म्हणाले – जलसावर चाहत्यांना भेटू शकणार नाही

बिग बी म्हणाले -“मी बरा होईपर्यंत सर्व कामे थांबवण्यात आली आहेत. मी जलसात विश्रांती घेत आहे. फक्त आवश्यक गोष्टींसाठी थोडेसे चालावे लागणार. होय, आराम तर सुरूच राहणार. मी जलसाच्या गेटवर माझ्या चाहत्यांना भेटू शकणार नाही, हे सांगणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. जलसावर येण्याचा विचार करणाऱ्यांना सध्या त्यांना याची माहिती द्या. बाकी सर्वकाही ठीक आहे.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *