माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष समद पटेल कुटुंबीयांचे केले सांत्वन
लातूर प्रतिनिधी: रवीवार दि. ५ मार्च २०२३लातूर शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष ॲड. समद पटेल यांच्या मातोश्री बदरूनिस्सा रजाक पटेल यांचे नुकतेच निधन झाले आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव
देशमुख यांनी रविवार दि. ५ मार्च रोजी दुपारी लातूर शहरातील प्रभाग १ मधील तकिया गल्ली येथील ॲड. समद पटेल यांच्या निवासस्थानी भेट देऊन पटेल
कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंखे, सचिव गोरोबा लोखंडे, डॉ. चेतन सारडा, डॉ. राजेंद्र मालू, रौफ पटेल, अरफात पटेल, रमीज पटेल, लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इमरान सय्यद, लातूर शहर अल्पसंख्यांक काँग्रेसचे
अध्यक्ष फारुख शेख, अहमदखा पठाण, सिकंदर पटेल, चंद्रकांत धायगुडे, दगडूआप्पा मिटकरी, गणेश देशमुख, रमेश सूर्यवंशी, विष्णुदास धायगुडे,
युनूस शेख, खाजा शेख, आकाश मगर आदींसह काँग्रेसचे विविध पदाधिकारी पटेल कुटुंबीय मित्र परिवार उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी चांदपाशा इनामदार कुटुंबीयांचे केले सांत्वन
लातूर प्रतिनिधी: रवीवार दि. ५ मार्च २०२३
लातूर शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी चांदपाशा इनामदार यांच्या मातोश्री लियाकतबी मन्नासाब इनामदार यांचे नुकतेच निधन झाले आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी रविवार दि. ५ मार्च रोजी सकाळी लातूर शहरातील जुना रेणापूर नाका परिसरातील जाफर नगर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी चांदपाशा इनामदार यांच्या निवासस्थानी भेट देऊन इनामदार कुटुंबीयांचे सांत्वन करून, त्यांना धीर
दिला. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंखे, एकबाल इनामदार, रशीद इनामदार, आदिल
इनामदार, सोहेल इनामदार, रमेश सूर्यवंशी, गणेश देशमुख, विष्णुदास धायगुडे, वसील इनामदार, जैद इनामदार, नदीब इनामदार, आतिफ इनामदार, शकील इनामदार, खलील इनामदार, चांद शेख, जब्बार शेख, गफार इनामदार, युसुफ करकम आदीसह इनामदार कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते.