लातूर – औसा तालुक्यातील उटी खू. येथे ३ मार्च रोजी स्वर साधना भजनी मंडळ कलापथकाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमाती व नवबौध्द घटकांतील नागरीकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने २८ फेब्रुवारी २०२३ ते ३ मार्च २०२३ पर्यंत कालावधीत औसा तालुक्यातील मातोळा, नागरसोगा, शिवणी बु., तुुंगी बु. उटी बु., वांगजी, चिंचोली तपसे व लातूर तालुक्यातील अंकोली, करकट्टा, चाटा, बाभळगाव, सारोळा आदि गावामध्ये रमाई घरकुल योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभीमान योजना, अनुसूचित जातीच्या बचत गटांना मिनी ट्रेलर-रोटाव्हेटर योजना, शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आदि योजनांची माहिती कलापथकाचे प्रमुख हणमंत महाराज सुर्यवंशी यांनी पटवून देऊन गीतांच्या माध्यमातून समाजातील नागरीकांना समजेल अशा पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळी गावातील ग्रामसेवक महेश जगताप, सरपंच वैशाली कांबळे, रफीक शेख उपसरपंच, रामदास भोजने, मारूती भोजने माजी चेअरमन, अंगद सुरवसे, गोविंद पोफळे, मल्हारी भोकरे, धनराज पोफळे, श्रीपाद देशपांडे, भागवत लोंढे आदिंसह गावकरी मोठया

संख्येने हजर होते.
संख्येने हजर होते.