ब्युटी फाऊडेंशनचा उपक्रम : महिलासाठी एक दिवसीय कार्यशाळेत अंजली वांगे प्रशिक्षण देणार
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना पार्लरचे साहित्य वाटप
लातूर (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येणा-या ८ मार्चला ब्युटी फाऊंडेशनच्या वतीने लातूरात ब्यूटी पार्लर चालवण्यात येणा-या महिलांकरीता अंतराष्ट्रीय दर्जाच्या प्रसिद्ध उच्चशिक्षीत अंजली वांगे मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिलांकरिता हायड्रा फेशियल प्रशिक्षण एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे संचालक सुदर्शन यांनी दिली आहे.
अधिक माहिती देताना म्हणाले की प्रसिद्ध अंजली या उच्चशिक्षेत असून ब्युटी पार्लरचे विविध प्रकाराचे कोर्स उत्तमरित्या पूर्ण केल्या आहेत. याचा मेकअप, हेअरस्टाईल, हेअर कट, हेअर कलरिंग, हायड्रा फेशियल असे विविध प्रकारचे उच्च उजांचे प्रशिक्षण पूर्ण करून ब्युटी पार्लरच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आज या लातूर येथे महिलासाठी उच्चदर्जाचे विविध प्रशिक्षण व कोर्सेस चालवतात. आजपर्यंत त्यांनी हजारों महिलांना ब्युटी पार्लरच्या माध्यमातून रोजगार उपलध करून दिला आहे. तसेच औरंगाबाद, पुणे, मुंबई, बंगलोर, आदी विविध ठिकाणी मेकअप व सेमीनारचे आयोजन करून पाचहजार महिलांना प्रशिक्षण दिले आहे. याच अनुषंगाने लातूरात दि.०८ मार्च वार बुधवार 2023 रोजी एक दिवसीय हायड्रा फेशियल, ब्यूटी फाऊंडेशनच्या वतीने व मोफत एक ब्रायडल मेकअप कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याच महिला दिनाचे औचित्य साधून सौंदर्य ब्युटी पार्लर शाहू चौक येथे ब्यूटी फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलासाठी दोन महिने बेसिक पार्लरचे कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. आज तेथील महिलांनी कोर्स पूर्ण केला आहे आज त्या महिला पार्लरचे प्रशिक्षण देवून स्वताः पार्लर उभे करून स्वतःच्या पायावर उभे टाकत आहेत हि बाब अतिशय चांगली आहे असे मत फाऊडेशनचे संचालक सुदर्शन यांनी व्यक्त केले आहे. येत्या ८ मार्च रोजी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र, पार्लरची खुर्ची, मशीन आदी साहित्य मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांना विविध प्रकराच्या आधावत परिपूर्ण माहिती अंजली मॅडम देणार आहेत. याचा लाभ सर्व महिलांनी व्यावा असे आवाहान ब्यूटी फाउडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुक महिलांनी ९८६०५०९२७३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.
*वाजवी दरात औषधे मिळण्यासाठी जन औषधी केंद्रे*
*https://jantaexpress.co.in/?p=4635*