• Wed. Apr 30th, 2025

ध्वनीक्षेपक, ध्वनीवर्धक वापर मर्यादा शिथील ठेवण्याचे दिवस निश्चित

Byjantaadmin

Mar 4, 2023

ध्वनीक्षेपक, ध्वनीवर्धक वापर मर्यादा शिथील ठेवण्याचे दिवस निश्चित

लातूर (जिमाका) : वर्षातील 15 दिवसांसाठी ध्वनीची विहित मर्यादा कायम ठेवून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक यंत्रणा वापरासाठी परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने लातूर जिल्ह्यात सन 2023 मध्ये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यासाठीची मर्यादा (ध्वनीची विहित मर्यादा राखून) शिथील ठेवण्याचे दिवस (15 दिवस) निश्चित करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी निर्गमित केले आहेत.

शिवजयंतीचा एक दिवस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा एक दिवस, 1 मे महाराष्ट्र दिन, गणपती उत्सवाचा पाचवा (गौरी विसर्जन), सातवा, अनंत चतुर्दशीचा आदला दिवस व अनंत चतुर्दशीचा दिवस व ईद-ए-मिलाद,  नवरात्री उत्सवातील अष्टमी व नवमी, दिवाळीतील लक्ष्मीपूजन, ख्रिसमस, 31 डिसेंबर, दिवाळी पाडवा व रमजान ईद आणि इतर एक दिवस प्रासंगिक या 15 दिवसांसाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबतची सूट देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी ही सूट लागू नसून त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित महानगरपालिका आयुक्त तथास्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहणार आहे, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही – राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *