भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा…
माजी जि.प.अध्यक्ष राहूल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली व भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर हस्ते उदघाटन…
निलंगा/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे सचिव युवा नेते अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शहरातील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे.या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन दिनांक २ रोजी सांयकाळी ६ वाजता भाजप युवा मोर्चा लातूर शहर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अजित शिवाजीराव कव्हेकर यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.भाजपा युवा नेते प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस ९ मार्च रोजी असून त्यानिमित्त या भव्य क्रिकेट स्पर्धा ठेवण्यात आल्या असून पहिले बक्षिस २ लाख व दुसरे १ लाख रूपयांचे आहे.या स्पर्धेत लातूर,उस्मानाबाद,बिड,नांदेड जिल्ह्यातील क्रिकेट टीमने सहभाग घेतला आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस संजय दोरवे, माजी जि. प. सभापती बापूराव राठोड, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शेषराव मंम्माळे, दगडू सोळुंखे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, तालुका अध्यक्ष शाहूराज थेटे, शहराध्यक्ष अँड वीरभद्र स्वामी, प्रा.पंडित सूर्यवंशी, राम पाटील, वैभव पाटील, हरिभाऊ काळे, युवा मोर्चाचे तम्मा माडीबोने, अर्जुन पौळ, स्पर्धेचे संयोजक आफरोज शेख, सौरभ नाईक आदि उपस्थित होते.
https://jantaexpress.co.in/?p=4561