• Wed. Apr 30th, 2025

लातुरात गॅस दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

Byjantaadmin

Mar 3, 2023
लातुर:-दिनांक 2 मार्च 2023 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माधवराव माने यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये केंद्र सरकारने घरगुती गॅसचे पन्नास रुपयाने तर व्यावसायिक गॅसचे 350 रुपये दर वाढवल्यामुळे केंद्र सरकारचा जाहीर निषेध आंदोलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने म्हणाले की अगोदरच जनता महागाईमुळे त्रस्त असून त्यात अजून केंद्र सरकारने  घरगुती गॅस 50 रुपये तर व्यावसायिका गॅस 350 रुपये ने दर वाढवून सर्वसामान्य माणसाचं कंबरडे मोडलेला आहे. एकीकडे जनतेला प्रलोभन दाखवायचे उज्वला गॅस प्रत्येक घरात देऊन एक स्वप्न दाखवलं परंतु ही योजना सपशेल फेल ठरली असून त्यात भर म्हणून पुन्हा गॅसचा भाव वाढ करून जनतेची घोर निराशाच या केंद्र सरकारने केलेली आहे. अगोदरच या भागातला शेतकरी वैतागलेला असून वर्षभर काबाडकष्ट करून शेतीत राब राब राबवून शेवटी शेतकऱ्याच्या हातात काहीही पडत नाही कांदा प्रत्येक एकरी 40 ते 60 हजार रुपये खर्च असतो .आणि बाजारात मात्र हा कांदा एक रुपया, दोन रुपये किलोने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. उत्पादन खर्च निघत नाही वाहतूक, आडत हमाली, तोलाई वजा जाता बार्शीच्या शेतकऱ्याला दोन रुपयाचा चेक देण्यात आला. ही शेतकऱ्याची क्रूर चेष्टा आहे. पारंपरिक शेतीला बगल देऊन नगदी पिकाकडे वळलेला शेतकरी आज हवाली झालेला आहे. केंद्र सरकारचे चुकीचे धोरण यातच शेतकऱ्याचे मरण आहे. कारण काय शेतकऱ्याच्या कांद्याला निर्यात बंदी करून शेतकऱ्याचा कांदा सडवण्याचा नासवण्याचा आणि भाव पाण्याचा षडयंत्र केंद्र सरकारचा डाव आहे.
सोयाबीन आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला प्रतिक्विंटल कमीत कमी आठ हजार पाचशे रुपये क्विंटल दर मिळाला पाहिजे होता, परंतु आज सोयाबीनचा भाव पाच हजार दोनशे रुपये पेक्षा जास्त मिळत नाही म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला प्रतिक्विंटल तीन हजार पाचशे रुपये चा फटका या ठिकाणी बसत आहे. सरासरी एखाद्या शेतकऱ्याला वीस क्विंटल सोयाबीन जर झालं तर 70 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याचा तोटा होत असून हा तोटा शेतकरी सहन करू शकत नाही. याची जाणीव मुळीच या केंद्र सरकारला नाही.
शेतकऱ्याच्या राशीला सुरुवात झाली यावर्षी सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं आणि अशाच परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने बाहेरून सोयाबीन मागवलं यामुळे  शेतकऱ्याला सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही. जगाचा असणारा पोशिंदा आज उपवास पोटी झोपण्याची वेळ या शेतकऱ्यावर आलेली आहे. आणि म्हणून शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यामधील तमाम शिवसैनिक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहून शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार असे जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका शोभाताई बेंजर्गे, जयाताई उटगे, उपजिल्हाप्रमुख योगेश स्वामी, विष्णू साबदे, महानगर प्रमुख विष्णू साठे, महानगर संघटक बालाजी जाधव, विधानसभा प्रमुख सिद्धेश्वर चव्हाण, तालुकाप्रमुख बाबुराव शेळके, लातूर ग्रामीणचे तालुकाप्रमुख एडवोकेट प्रवीण मगर, जिल्हा सह समन्वयक राज लाटे, शहर प्रमुख सुनील बसपुरे, रमेश माळी, त्रिंबक स्वामी ,हनुमंत पडवळ, एडवोकेट नारायण माने, तानाजी करपुरे ,युवराज वंजारे, माधव कलमुकले, औसा पंचायत समितीचे पंचायत समिती सदस्य पिंटू माने, भास्करराव माने हिरालाल साबळे, शंकर गंगणे ,विधी आघाडीचे अडवोकेट वैभव बिराजदार, ईश्वर सूर्यवंशी, प्रीतीताई कोळी ,अलका मुगळे, माजी नगरसेविका संध्याताई आरदवाड यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
https://jantaexpress.co.in/?p=4543

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed