• Wed. Apr 30th, 2025

पन्नास वर्षानंतर भेटले माजी विद्यार्थी

Byjantaadmin

Mar 3, 2023

पन्नास वर्षानंतर भेटले माजी विद्यार्थी
लातूर- दिनांक २६/०२/२०२३ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील १९७३ च्या माजी विद्यार्थ्यांचे तब्बल ५० वर्षानंतर स्नेह-मिलन कार्निव्हल रिसॉर्ट, अंबेजोगाई रोड, लातूर  या ठिकाणी उत्साहात व जल्लोषात पार पडले. या स्नेह-मिलन कार्यक्रमासाठी सबंध महाराष्ट्रातून ४७ माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. यातील बहुतांश माजी विद्यार्थी विद्यापीठात तसेच शासनातील अनेक उच्च  पदांवर कार्यरत होते व सध्या निवृत्तीचे समाधानी जीवन जगत आहेत.
या कार्यक्रमाची सुरुवात आयोजकांतर्फे पुष्पगुच्छ व माजी विद्यार्थी श्री. प्रदीप चालुक्य यांच्या तर्फे श्री. दयानंद सरस्वती यांचे पुस्तक भेट देऊन करण्यात आली. दरम्यान माजी विद्यार्थी श्री  कुमार ठोंबरे यांच्या बासरी वादनाने कार्यक्रमात रंगत आणली. यानंतर सर्वानी मनोगताच्या माध्यमातून आपापल्या कारकिर्दीचा आढावा मांडला व महाविद्यालयीन तसेच वसतिगृहातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. याचबरोबर यापुढे अशा प्रकारचे स्नेह-मिलन वारंवार आयोजित करण्याचा सर्वांनी मानस व्यक्त केला व पुढील भेटीसंदर्भात चर्चा करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लातूर व परिसरात राहणारे  श्री.बाबासाहेब कोरे,श्री. आबासाहेब चव्हाण (माजी कार्यकारी संचालक, रेणा सहकारी साखर कारखाना), श्री. ज्ञानोबा फुलारी (माजी अतिरिक्त जिल्हाधीकारी),श्री. डॉ. बापूराव माने (माजी कृषी अधिकारी व सहाय्यक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, लातूर ) श्री. शिवानंद खंदारे( माजी कृषी अधिकारी ) ,श्री. अशोक रेवडकर ( माजी डेअरी विकास अधिकारी), श्री. श्याम हाके (माजी ऊस विकास अधिकारी,  जय जवान सह साखर कारखाना ),श्री. गोविंद मनाळे  ( प्रगतिशील शेतकरी) , श्री. प्रभाकर मुळे (माजी कृषी अधिकारी),श्री. एम. एम. शेख( माजी कृषी अधिकारी) तसेच  पुढील पिढीतील श्री अमोल आबासाहेब चव्हाण व कुणाल बाबासाहेब कोरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी व सिनेगायक श्री. उदय वायकर , परभणी यांनी केले.

 

सिद्धेश्वर यात्रेत रविवारी रंगणार कुस्त्यांचा फड विजेत्या मल्लास  मिळणार चांदीची गदा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed