महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी
15 मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
लातूर, दि.02 (जिमाका) : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार नियमावली बाबतचा शासन निर्णय दिनांक 08 मार्च 2019 रोजी निर्गमित करण्यात आलेला अहे. त्यानुसार या पुरस्कारासाठी 15 मार्च 2023 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी केले आहे.
वीरशैव-लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, अध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दाद, दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावेत याकरिता व्यक्तींसाठी एक व सामाजिक संस्थेसाठी एक असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येतात.
महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी जिल्ह्यातील इच्छुक व्यक्ती व संस्था यांनी 15 मार्चपर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामध्ये सीलबंद लिफाफ्यात आपले विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. या पुरस्कारासाठी पात्रतेबाबतची नियमावली 8 मार्च 2019 च्या शासन निर्णयासोबत जोडण्यात आली आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच विहीत नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्या कार्यालयातउपलब्ध आहेत.