• Tue. Apr 29th, 2025

नागालँडमध्ये रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षालाही मिळाल्या ‘इतक्या’ जागा

Byjantaadmin

Mar 2, 2023
The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.

ईशान्य भारतातील तीन राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी ( २७ फेब्रुवारी ) मतदान पार पडलं. तर, त्रिपुरा राज्यात १६ फेब्रुवारी रोजी मतदान संपन्न झालं होतं. आज तिन्ही राज्यांची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, निकाल हाती येणार आहे. त्रिपुरात भाजपा, नागालँडमध्ये एनडीएचा सहकारी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी ( एनडीपीपी ) आणि मेघालयात नॅशनल पीपल्य पार्टी ( एनपीपी ) आपली सत्ता राखण्यात यशस्वी होणार का? याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे.

नागालँडमध्ये रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षालही मिळाल्या ‘इतक्या’ जागा

नागालँडलमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्ष पार्टीचा उमेदवार २ जागांवर निवडून आले आहेत. तर, एनडीपीपीचा उमेदवार १ जागेवर निवडून आला आहे. भाजपाचे उमेदवार २ जागेवर निवडून आले असून, १२ जागांवर आघाडीवर आहेत

नागालँडमध्ये एनडीपीपीने पार केला बहुमताचा आकडा; मेघालयात एनपीपी २६ जागांवर आघाडीवर

नागालँडमध्ये भाजपा मित्रपक्ष असलेली एनडीपीपी पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आहे. एनडीपीपी ३७ जागांवर आघाडीवर आहे. तर, मेघालयात एनपीपी २६ जागांवर पुढं आहे. काँग्रेस ५ आणि भाजपा ६ जागांवर मेघालयात समाधान मानावं लागत आहे. अद्यापही मेघालयात स्पष्ट बहुमत कोणाला मिळालं नाही.

‘कसबा’वरून विधानसभेत जुगलबंदी:पटोलेंची धंगेकरांना जागा देण्याची मागणी, फडणवीस म्हणाले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed