त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. 4 तासांहून अधिक काळाची मतमोजणी झाली आहे. तिन्ही राज्यांतील सर्व जागांचे कल समोर येत आहेत. नागालँड आणि त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत असून NPP मेघालयात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.
नागालँडमध्ये 40 आणि त्रिपुरामध्ये 33 जागांवर भाजप युती आघाडीवर आहे. मेघालयात NPP 24 जागांवर आघाडीवर आहे. भाजप येथे 5 जागांवर मर्यादित असल्याचे दिसते.
त्रिपुरा-नागालँडमध्ये एक्झिट पोलने भाजप आघाडीला बहुमताचा अंदाज वर्तवला आहे. मेघालयमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळण्याची अपेक्षा नाही. म्हणजेच त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचे अपडेट्स…
- रात्री 8 वाजता पंतप्रधान भाजप मुख्यालयात जातील. 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर संबोधित करतील.
- दिमापूर III ची जागा जिंकून हेकानी जाखलू या नागालँडच्या पहिल्या महिला आमदार बनल्या आहेत. नागालँड हे 1963 मध्ये राज्य झाले, आजपर्यंत तेथे एकही महिला विधानसभा निवडणूक जिंकलेली नव्हत
- त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा पश्चिम त्रिपुरातून आघाडीवर आहेत.
- नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ कोहिमामधील उत्तर अंगामी II जागेवरून आघाडीवर आहेत.
- मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॉड संगमा दक्षिण तुरा मतदारसंघातून आघाडीवर आहेत.