महाविजय संयोजन समीतीवर अरविंद पाटील निलंगेकर यांची निवड
प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यानी केली निवड
निलंगा/प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने महाविजय २०२४ अभियान जाहीर केले असून या संयोजक समीतीवर भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांची निवड केली आहे.
सदरील अभियानाची संयोजन समिती दिनांक १ रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यानी घोषित केली आहे. यात प्रदेश संयोजक म्हणून श्रीकांत भारतीय तर भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, सुनील कर्जतकर, प्रदेश रविंद्र अनासपुरे, मुख्यालय प्रभारी विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस विश्वास पाठक, प्रदेश सहमुख्यप्रवक्ते समन्वय व श्वेता शालिनी, प्रदेश सचिव संजय फांजे, प्रदेश सहकार्यालय सचिव – नवनाथ बन, प्रदेश माध्यम प्रमुख,तसेच संजय उपाध्याय, सरचिटणीस, मुंबई भाजपा यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांची संयोजन समिती मध्ये निवड झाल्यामुळे लातूर जिल्हा भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यानी या निवडीचे स्वागत केले आहे.