मुंबई, 01 मार्च: महाराष्ट्र स्टेट बोर्डाची परीक्षा सध्या सुरू आहे. यातच राज्यातील काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र त्यात आता दुष्काळात तेराव महिना म्हणून शिक्षकांनी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
2005 पूर्वी व 2005 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी,आश्वासित प्रगती योजना लागू करावी शिक्षकांची रिक्त असलेले पदे भरण्यात यावी इत्यादी मागण्यासाठी शिक्षकांनी आंदोलन सुरू केलं आहे. याच मागण्या जाऊनही पूर्ण करण्यात आलेल्या नसल्यामुळे शिक्षकांनी उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.
परीक्षेच्या आधीपासूनच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. मात्र यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. म्हणूनच शिक्षकांनी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीचं काम बंद केलं आहे आणि यावर बहिष्कार टाकला आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर सुद्धा होऊ शकतो आज शिक्षकांच्या वतीने अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने व आंदोलन करून शासन विरोधात घोषणाबाजी केली आहे.
या आधी इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये प्रश्नाऐवजी चाक उत्तर छापून आल्याचा प्रकार घडला आहे. तर हिंदीच्या पेपरमध्येही चूक झाल्याचा प्रकार आढळून आला आहे. यंदाच्या बोर्डाच्या परीक्षेत बोर्डाकडून होणाऱ्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना करावा लागतो आहे. तसंच फ्री मार्क्स मिळत असले तरी विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो आहे.
घरगुती सिलेंडर ५० रुपयांनी, तर व्यावसायिक सिलेंडर ३५० रुपयांनी महागला