• Wed. Apr 30th, 2025

कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचे नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Byjantaadmin

Oct 5, 2022

नवी दिल्ली, ४ : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेंतर्गत आज नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कोल्हापूर-मुंबई या विमानसेवेचे उद्घाटन केले.

येथील नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या राजीव गांधी भवन येथे आयोजित कार्यक्रमात नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. सिंदिया  यांच्या  हस्ते  विभागाचे राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंह, अपर सचिव उषा पाधी  यांच्या उपस्थितीत कोल्हापूर – मुंबई  विमानसेवेचे  दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. पुढील वर्षी मार्च महिन्यात कोल्हापूर विमानतळाच्या देशांतर्गत टर्मिनलचे (डोमेस्टिक टर्मिनल) उद्घाटन करण्यात येईल, असे श्री. सिंदिया यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास कोल्हापूर विमानतळाहून खासदार सर्वश्री संजय मंडलिक, धैर्यशील माने, धनंजय महाडिक तसेच पंढरपूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ ,आमदार ऋतूराज पाटील उपस्थित होते.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान योजनेंतर्गत देशातील २ टियर आणि ३ टियर शहरांना विमानसेवेने जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर आणि मुंबई शहरांमध्ये ही विमानसेवा सुरु झाली आहे. या शहरांदरम्यान स्टार एअरच्या वतीने आठवड्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवसांमध्ये ही  विमानसेवा असेल.

मार्च २०२३ मध्ये कोल्हापूर विमानतळाच्या देशांतर्गत टर्मिनलचे उद्घाटन

श्री. सिंदिया म्हणाले की, देशातील जनतेला रास्त दरात विमानसेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने ‘उडान योजना’ सुरु केली आहे. आतापर्यंत देशातील ४३३ मार्गांवर ही सेवा सुरु झाली असून १ कोटींहून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले. मार्च २०२३ मध्ये कोल्हापूर विमातळाच्या देशांतर्गत टर्मिनलचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे श्री. सिंदिया यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed