मुंबई, 26 फेब्रुवारी : ‘मुंबई पालिकेकडून काही चांगलं काम होत आहे, त्याला आम्ही सपोर्ट करू. पण काही गडबड झाली तर आम्ही सोडणार नाही. तुम्हाला काम झाल्यावरच आम्ही सांगू की,हे आमच्यामुळे काम झालं आहे’ असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सुशोभीकरण अंतर्गत ३२० विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडत आहे. यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला.
आज आनंदाची गोष्ट आहे. मुंबईच्या कायापालट करण्याचा तिसऱ्या टप्प्याचं आज भूमिपूजन होत आहे. आत्तापर्यंत 320 काम झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इक्बाल सिंग चहल यांना मुंबईचा कायापालट करण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेचा जनतेचा पैसा बँकेत ठेवण्यापेक्षा तो जनतेसाठी खर्च करून सुखकर कसं जगता येईल त्यावर भर द्यावा, असं म्हणत फडणवीसांना ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला.
आत्ता काही काम सुरू केलं तर विरोधक म्हणत आहेत की, आम्हीच हे काम केलं आहे. पण मीच केलं आहे ही प्रवृत्ती चुकीची आहे. तुम्ही काही केलं नाही म्हणून आम्हाला हे काम करावं लागलं आहे, असं म्हणत फडणवीसांना उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
‘मुंबईमधील रस्त्यांच्या संदर्भात अनेक मीम तयार होतात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. वर्षानुवर्षे एकाच रस्त्यावर पैसे खर्च करण्याची नीती आता बंद होणार आहे. काँक्रीटीकरण करण्याचं काम आता हाती घेतला आहे. 500 किलोमीटर रस्त्यांची काम हाती घेतलं आहे. 2 वर्षात हे काम होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 2 वर्षाच्या कार्यकाळात हे काम होत असेल तर ही काम 25 वर्षात का झालं नाही? असा सवालही फडणवीसांनी केला.
‘खूप वर्षांपासून STP चा काम रखडलं होतं ते काम आत्ता आपण हाती घेतलं आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण हे काम हाती घेतलं आहे. त्यामुळे समुद्राचं प्रदूषण कमी होईल. मुंबईमध्ये आता ईस्ट आणि वेस्ट ची कनेक्टिव्हिटी सुरू करण्यासाठी आम्ही अनेक प्रोजेक्ट सुरू केलं आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
मुंबईच्या विकासाला मानवी चेहरा देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन