शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या संचमान्यता अद्याप झालेल्या नाहीत. कारण शासनाने आधार सक्ती केल्याने आधार प्रमाणीत विद्यार्थी संख्येच्या आधारेच संचमान्यता केली जाणार आहे. शाळांनी स्टुडंट पोर्टलमध्ये त्यांच्याकडील इनव्हॅलीड, मिसमॅच विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये आवश्यक दुरुस्ती 28 फेब्रुवारी अखेर पूर्ण करावी.
30 टक्के विद्यार्थ्यांचे आधार मिसमॅच आहेत. त्यामुळे अपलोड करणे, मिसमॅच दुरुस्त करण्याच्या कामास दिरंगाई झाल्यास याची सर्व जबाबदारी संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांवर असेल, असे प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.
राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांतील विद्यार्थ्यांची नोंद पुणे एनआयसी यांच्याकडील सरल प्रणालीतील स्टुडंट पोर्टलवर करण्यात येते. यासाठी स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थ्यांचे विविध प्रकारची माहिती नोंद कशा प्रकारे करावी याबाबत शासनाने वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची अचूक नोंद स्टुंडट पोर्टलवर अनिवार्य केली आहे.
मुख्याध्यापकांनी कारवाई करावी
त्यात शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये आधार प्रमाणे संबंधीत विद्यार्थ्यांचे नावे असावे, अशीही तरदूत केली आहे. शाळांना वारंवार सूचना देवूनही विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्राप्त होत नाहीत, याचा अर्थ शाळेकडे आधार क्रमांक नसणारे, सतत गैरहजर असणारे विद्यार्थी देखील पटावर असण्याची शक्यता आहे. याबाबत तरतूदीनुसार मुख्याध्यापकांनी आवश्यक कारवाई करावी, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांचा डेटा जुळत नसल्याचे समोर
विद्यार्थ्यांचे आधार नोंद केल्यानंतर स्टुंडट पोर्टलवर शाळेच्या रेकॉर्डवरील विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, लिंग अशी माहिती पोर्टलवर नोंद करण्याची सुविधा मुख्याध्यापक लॉगिनवर देण्यात आली आहे. सदर माहिती नोंद केल्यानंतर काही विद्यार्थ्यांचा डेटा जुळत नसल्याचे आधार प्राधिकरणाकडून अवैध असल्याचे कळविण्यात आले होते.
अवैध मिसमॅच
शाळांनी विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती जशी आहे, तशीच नोंद न करता किरकोळ चूका केल्यामुळे विद्यार्थ्यांचे आधार नोंद अवैध येत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्याच्या पर्सनल डिटेल्स विद्यार्थ्यांच्या आधार कार्डप्रमाणे जशीच्या तशी नोंद केल्यास अवैध, मिसमॅचचे प्रमाण कमी होईल.
योग्य ती नोंद करा
जर आधारकार्डमध्ये दुरुस्ती करणे आवश्यक असल्यास तशी दुरुस्ती केल्यानंतर योग्य ती नोंद करावी. ज्या शाळांनी अद्यापही विद्यार्थ्यांची आधार विषयक नोंद केलेली नाही त्यांनी अशा विद्यार्थ्यांची 10 मार्चपर्यंत आवश्यक नोंद करावी. अशा सूचना प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.
30 टक्के विद्यार्थ्यांचे आधार मिसमॅच
जवळपास 30 टक्के विद्यार्थ्यांचे आधार हे मिसमॅच असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. काहींच्या नावात, जन्मतारखेत चुका आहेत.
एकनाथ शिंदे फक्त मराठा समाजाचे आहेत का?:रोहित पवार यांचा सवाल, म्हणाले…