आत्ताचे मुख्यमंत्री फक्त मराठा समाजाचे आहेत का? त्यांचे कर्तृत्व काहीच नाही का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरुन रोहीत पवार यांनी चांगलाच टोला लगावला आहे.
रोहित पवार म्हणाले, अशापद्धतीने विकास बाजूला ठेवून जे वक्तव्य तुम्ही करतात ते अयोग्य आहे. सर्वसमावेशक राजकारण करण्याची तुम्हाला गरज आहे. जातीय आणि धार्मिक राजकारण महाराष्ट्रात आणू नये असे मत रोहित पवार यांनी यावेळी उपस्थित केले.
विकास-नोकरीबाबत निर्णय व्हावे
आम्ही तेव्हाच स्वागत केले होते. महाविकास आघाडीत तेव्हाच निर्णय घेतला होता. आम्ही याचे स्वागत करतो. महाविकास आघाडीचे सरकार असताना शेवटच्या कॅबिनेट बैठकीतच हा निर्ण घेतला होता. आणि आता केंद्र सरकारने आमच्या निर्णयाला मंजूरी दिली याचा आनंदच आहे. आता नामांतराचा निर्णय झाला आहे. विकास आणि नोकरी याबाबत निर्णय व्हावे. अशी अपेक्षा रोहित पवार यांनी उपस्थित केला.
ज्यावेळी अनेक गोष्टी हाताबाहेर जातात, त्यावेळी अशी वक्तव्ये केली जातात. एकनाथ शिंदे फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहे का? या गोष्टी अयोग्य आहे. सर्व समाजासाठी एकत्रित धोरण ठरविणे गरजेचे आहे. इतर समाजाचे देखील प्रलंबित प्रश्न आहे, ते सोडविणे आवश्यक आहे, असेही पवार म्हणाले.
पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीत पैशाचा वापर होत असल्याच्या चर्चांवर रोहित पवार म्हणाले, लोकांमध्ये तशा चर्चा आहेत. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले आहे. या निवडणुकीत भाजपने किती आर्थिक ताकद लावली आहे? सर्व महत्त्वाचे नेते तिथे व्यस्त आहेत. नवंचित बहुजन आघाडी अप्रत्यक्षरित्या भाजपाला मदत करत आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला.
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
गुलाबराव पाटील म्हणाले, गुलाबराव गद्दार झाला म्हणतात. मी गद्दार झालो नाही, तर मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर जात होता त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली. जळगावात जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. बंडखोरीनंतर शिंदे गटातील नेत्यांवर गद्दार असा आरोप होतो. या आरोपांवर गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.