• Tue. Apr 29th, 2025

पक्ष चोरला, नाव चोरलं… तरीही उद्धव ठाकरे वाघच, महाराष्ट्र त्यांच्याच मागे: अरविंद केजरीवाल

Byjantaadmin

Feb 25, 2023

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या पक्षाची चोरी झाली, त्यांच्या चिन्हाची आणि नावाची चोरी झाली, पण बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते, आणि उद्धव ठाकरे हे त्या वाघाचे सुपुत्र आहेत, त्यामुळे महाराष्ट्र त्यांच्या मागे असल्याचं मत दिल्लीचे मुख्यमंत्री arvind kejriwal यांनी व्यक्त केलं. सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे यांना न्याय देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना भेटीचं निमंत्रण  दिलं होतं. या भेटीवेळी अरविंद केजरीवाल यांनी हे मत व्यक्त केलं.

ईडी आणि सीबीआयचा वापर हे भित्रे लोक करतात. भाजपवाले ज्या लोकांना घाबरतात त्यांच्याविरोधात या तपास यंत्रणांचा वापर केला जातोय. आम्ही काही केलं नाही, त्यामुळे आम्ही घाबरत नाही, शेवटी सत्याचाच विजय होणार असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

भाजपला गुंडगिरीशिवाय काही येत नाही, यामुळे देश पुढे जाणार नाही. दिल्लीतील जनतेनं आम्हाला बहुमत दिलं, तरीही दिल्लीत महापौर बसवायला आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावं लागलं असं केजरीवाल म्हणाले. या देशात एकच पक्ष आहे जो 24 तास निवडणुकीबद्दल विचार करतो असं सांगत केजरीवाल यांनी भाजपला टोला लगावला. आम्ही देशाच्या विकासाच्या मुद्द्यांवर विचार करतो असंही ते म्हणाले.

कोरोना काळात उद्धव ठाकरेंचं काम कौतुकास्पद

कोरोना काळात उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या प्रकारे काम केलं ते कौतुकास्पद आहे. कोरोना काळातmaharashtra  आणि मुंबईतील अनेक कामांची दिल्लीमध्ये आम्ही अंमलबजावणी केली असं अरविंद केजरीवाल म्हणाले. ते म्हणाले की, आज लोकांना नोकऱ्या नाहीत, युवक बेरोजगार आहेत, याचवेळी देशातील महागाई वाढत आहे. एलआयसीसारखी कंपनी तोट्यात जोत आहे. देशातील काही उद्योगपतींना फायदा करुन देण्यासाठी केंद्र सरकार देशाला विकायला निघालंय.

 

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं. त्यामुळे आता आपली जबाबदारी वाढली आहे. आता या देशामध्ये लूटालूट सुरू आहे. ती थांबली पाहिजे. त्यामुळे हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे. प्रत्येक घरांत चूल पेटली पाहिजे, प्रत्येक घरांत अन्नधान्य पोहचल पाहिजे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed