लातूर जिल्हा बँकेला एन पी ए बेस्ट मॅनेजमेंट पुरस्कार
बँकेच्या संचालक मंडळाने केले अधिकारी कर्मचारी यांचे कौतुक
लातूर :-फ्रंटियर्स इन को-ऑपरेटीव्ह बँकिंग आवार्ड मुंबई या संस्थेकडून देण्यात येणारा साल सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा पुरस्कार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस मिळाला आहे. त्याबद्दल बँकेच्या मुख्यालयात बँकेचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब, बँकेचे चेअरमन तथा आमदार धिरज विलासरावजी देशमुख साहेब तसेच आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
मुंबई येथील फ्रंटियर्स को-ऑपरेटीव्ह बँकींग आवार्ड या संस्थेकडून देशभरातील ३५१ जिल्हा बँकांना पुरस्कारासाठी आमंत्रित केले होते. ज्या बँका राष्ट्रीय बँकेच्या सुचनेनुसार आर्थिक निकष पालन करतात आशा बँकांना विविध पुरस्काराने सन्मानीत केले जाते. त्यात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला साल सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी बेस्ट एन पी ए मॅनेजमेंट पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दल बँकेच्या मुख्यालयात दि. २२ फेब्रुवारी रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री मार्गदर्शक दिलीपरावजी देशमुख साहेब बँकेचे अध्यक्ष धिरज विलासरावजी देशमुख आ. बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव तथा सन्माननीय संचालक मंडळाने अधिकारी / कर्मचान्यांचे कौतूक करून अभिनंदन केले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक आमदार बाबासाहेब पाटील, अॅड. श्रीपतराव काकडे, संचालक अशोकराव पाटील निलंगेकर, पृथ्वीराज सिरसाट, संचालक एन. आर. पाटील, व्यंकटराव बिरादार, भगवानराव पाटील तळेगावकर, राजकूमार पाटील, दिलीप पाटील नागराळकर, संचालक मारोती पांडे, जयेश माने, अनुप शेळके, तज्ञ संचालक सुनिल कोचेटा, संचालिका श्रीमती लक्ष्मीताई भोसले, संचालिका सौ. स्वयंप्रभा पाटील, सौ. सपना किसवे, सौ. अनिता केंद्रे, बँकेचे कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव, सरव्यवस्थापक सि. एन. उगीले, टी. एम. जाधव बँकेचे विविध विभाग प्रमुखांसह कर्मचारी उपस्थित होते.