रूपाली ठोंबरे पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक नेत्या मानल्या जातात. रूपाली ठोंबरे या माजी नगरसेविका आहेत. त्यांच्याविषयी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ती भांडखोर आहे फार आहे. पोलिसांनी प्रश्न विचारला की त्यांच्या अंगावर जाते. तिला आवरावं लागतं असं म्हटलं आहे. शरद पवारांनी हे वाक्य उच्चारताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. तसंच शरद पवारही दिलखुलासपणे हसू लागले. शरद पवार हे एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं की त्या व्यक्तीचा स्वभाव विशेष सांगतात. त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. जबरदस्त स्मरणशक्ती आणि त्या व्यक्तीचं अत्यंत योग्य वर्णन खास शब्दांमध्ये करण्याची त्यांची हातोटी आहे. रूपालीताई ठोंबरे पाटील यांच्याविषयी शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा शरद पवारांच्या याच स्वभावाचा अनुभव उपस्थित पत्रकारांना आला.
काय म्हणाले शरद पवार रूपाली ठोंबरे पाटील यांच्याविषयी?
शरद पवार यांना आज पत्रकारांनी रूपाली ठोंबरे पाटील यांच्याविषयी एक प्रश्न विचारला. त्यावर कुणाविषयी बोलताय? असं शरद पवार म्हणाले मग रुपाली ताई ठोंबरे पाटील असं पत्रकाराने सांगितल्यावर शरद पवार चटकन म्हणाले भांडखोर आहे फार. पोलीस काही बोलू लागले तर ती थेट अंगावर जाते त्यांच्या. तिला आवरावं लागतं. शरद पवारांनी एवढं मोजकी वाक्यं उच्चारताच सगळेच हसू लागले.
रूपाली पाटील मनसेतून राष्ट्रवादीत
डिसेंबर २०२१ मध्ये रूपाली पाटील यांनी RAJ THAKRE यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिली आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनसेच्या फायरब्रँड नेत्या अशी रूपाली पाटील यांची ओळख होती. त्यांनी राज ठाकरेंना एक पत्र लिहून पक्ष सोडला. त्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही त्या अल्पावधीत प्रसिद्ध झाल्या कारण त्यांचा आक्रमक आणि रोखठोक स्वभाव.
कोण आहेत रूपाली ठोंबरे पाटील?
रुपाली पाटील ठोंबरे या राष्ट्रवादीच्या फायरब्रँड नेत्या आहेत. डिसेंबर २०२१ च्या आधी त्या मनसेत होत्या. PUNE मनसेचा आक्रमक आणि लढवय्या चेहरा म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. मात्र त्यांनी मनसे सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. तरुण-तरुणी, महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष काम करणं हे त्यांचं कौशल्य आहे. रूपाली ठोंबरे पाटील या पुणे मनपात मनसेच्या नगरसेविका होत्या. २०१७ मध्ये पुणे मनपाच्या प्रभाग क्रमांक १५ मधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी गरोदर असून गल्लीबोळात प्रचार करुन त्यांनी लक्ष वेधलं होतं. याच आक्रमक आणि रोखठोक रूपाली ठोंबरे पाटील यांच्याविषयी प्रश्न विचारला असता SHARAD PAWAR त्यांना भांडखोर आहे फार असं म्हणाले आहेत.