मुंबई :PM KISAN SANMAN योजना म्हणजे आहे PM KISAN YOJNA शेतकऱ्यांना दर वर्षाला 6000 रुपये तीन महिन्यांच्या अंतराने येतात. ही योजना सुरू होऊन आता चार वर्ष पूर्ण होतील. या योजनेचा 13 अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. मात्र आता होळीआधी तो जमा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.तुम्ही तेराव्या हप्त्याचे लाभार्थी आहात की नाही हे कुठे आणि कसं तपासायचं? तुमचं या लिस्टमध्ये नाव आहे की नाही हे कुठे तपासायचं याबाबत सविस्तर जाणून घेऊया. नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे तुम्ही आजच हे चेक करणं गरजेचं आहे.
तुम्हाला पीएम किसान योजनेच्या आगामी हप्त्यांचा लाभ घ्यायचा असेल, तर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे. तुम्ही जर E KYC केलं नसेल तर तुम्हाला ह्या हप्त्याचे पैसे येणार नाहीत. या योजनेबाबत कोणत्याही प्रकारच्या समस्या असल्यास तुम्ही [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात.
याशिवाय तुम्ही पीएम किसान योजनेद्वारे हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर कॉल करू तुमच्या शंका किंवा अडचणी सांगू शकता.
तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन लॉगइन करायचं आहे. तिथे जाऊन तुम्ही E KYC करू शकता. तिथे तुम्हाला लाभार्थी शेतकऱ्यांची नाव देखील पाहता येणार आहेत. तुमचं नाव नसेल तर तुमचं कोणतं कागदपत्र नाही ते देखील चेक करणं आवश्यक आहे. त्यामुळे लगेच तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. काही शंका असल्यास टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधा.
तुम्हाला पीएम किसान योजनेच्या आगामी हप्त्यांचा लाभ घ्यायचा असेल, तर ई-केवायसीची प्रक्रिया नक्कीच पूर्ण करा. यासाठी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल. वेबसाइट व्यतिरिक्त, तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊन ई-केवायसी देखील करू शकता. असे न करणाऱ्या शेतकऱ्यांना 13वा आणि त्यापुढील कोणताही हप्ता मिळणार नाही असं केंद्र सरकारने सांगितलं आहे.