• Fri. Aug 8th, 2025

आयएएस अधिकाऱ्याचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू

Byjantaadmin

Feb 23, 2023

मुंबई : काळा घोडा परिसरातील एका हॉटेलमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात सचिव म्हणून नियुक्ती असलेले आयएएस प्रशांत नवघरे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. प्राथमिक तपासात अ‍ॅलर्जीमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय वर्तवण्यात येत असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

बुधवारी सायंकाळच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे काळा घोडा परिसरातील हॉटेलमध्ये जेवायला गेले असताना ही घटना घडली. जेवताना काही अ‍ॅलर्जीची लक्षणे दिसून आली आणि ते तिथेच खाली कोसळले. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) करण्यात आली आहे. नवघरे यांचा मृत्यू कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट करणारा अहवाल मिळालेला नाही. त्यामुळे अ‍ॅलर्जीमुळे मृत्यू झाला की आणखी कोणत्या कारणाने याचा तपास सुरू आहे, अशी माहिती माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *