• Fri. Aug 8th, 2025

नाचून शिव जयंती साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करा -डॉ.नंदाताई पाटील

Byjantaadmin

Feb 21, 2023

नाचून शिव जयंती साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करा…डॉ.नंदाताई पाटील

अक्का फाँडेशन व सार्वजनिक शिवजयंती मोहत्सव निलंगा यांचा पुढाकार…

निलंगा/प्रतिनिधी

छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणे आजची पिढी घढवायची असेल तर शिव जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करावी असे आव्हान डॉ नंदाताई पाटील यानी केले.

अक्का फाँडेशन व सार्वजनिक जयंती मोहत्सव निलंगा यांच्या पुढाकारातून साजरी केलेल्या निलंगा येथील डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर सभागृहामध्ये आयोजित एकदिवशीय व्याख्यानात त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अरविंद पाटील निलंगेकर, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव,डॉ.वैशाली हातागळे,डॉ.गीताताई देशमुख,मुख्याद्यापिका सरस्वती नागमोडे,कविता तोष्णीवाल,उर्मिला माने,अदि उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ.म्हणाल्या आजच्या पिढीला हातात तलवार दांडपट्टा घेवून लढण्याची गरज नाही.तर त्यानी हातात पेन घेऊन या विज्ञानवादी जगात विज्ञावाद स्वीकारून आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून छञपती शिवाजी महाज यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे.अनेक जाती धर्माचे मावळे सोबत घेऊन छञपती शिवराय व आई जिजाऊ यानी खरी लोकशाही रूजवण्याचा त्यावेळी प्रयत्न केला.शेतकऱ्यांना,कष्टक-यांना,महिलांना,पिडीताना त्या माध्यमातून सहकार्य केले.अनिष्ट रूढी परंपरेला बगल देत या राज्यातील प्रत्येक घटकाला सुखी समाधानी करण्याचा छञपती शिवरायांचा प्रयत्न होता.त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून येणाऱ्या पिढीने,राज्यकर्त्यांनी,गावपुढा-यानी कार्य करणे गरजेचे आहे.शिवजयंतीच्या माध्यमातून समाजात चांगले व सुसंस्कृत विचार पेरण्याची गरज आहे.हे आपले कृर्तव्य समजूनच प्रत्येकाने सामाजिक व राजकीय कार्य करणे गरजेचे आहे असे डॉ.पाटील यानी शेवटी समाजाला उद्देशून सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक सौ.अर्चना जाधव यानी तर सुञसंचलन राजश्री शिंदे,स्नेहा बोळे व आभार वैशाली हातागळे यानी मानले.

हा व्याखानाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,शेषराव ममाळे,मनोज कोळ्ळे,डॉ.लालासाहेब देशमुख,शफीक सौदागर,इरफान सय्यद,तम्मा माडीबोने,प्रदिप पाटील,सुमित इनानी अदिने परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *