शिवजन्मोत्सवाने निलंगा शहर दुमदुमले.
निलंगा:-रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने शिवशाहीर लक्ष्मण भोसले, नळदुर्ग यांचा भव्य दिव्य पोवाडा व पाळणा कार्यक्रम घेण्यात आला.त्यामुळे निलंगा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निलंगेकरांनी मोठी गर्दी केली होती.
झुलवा पाळणा..बाळ शिवाजीचा..!या गाण्यांनी सर्व आसमंत दुमदुमले.वीरमाता,विरपत्नी, आणि वीरकन्याच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जणू शिवकालीन दृष्य अवतरले होते.
शहरात शिवजयंती निमित्ताने सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराज चौकात गर्दी जमली होती.महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक असे शिवकालीन रूप देण्यात आले होते.संपूर्ण पुतळा परिसरात रोषणाई करण्यात आली होती.पुतळ्यासमोरच राजमाता जिजाऊ व पाळणा सजवण्यात आला होता.त्यात बाळशिवबाची मूर्ती ठेवण्यात आली होती.या स्फूर्तिदायक आणि उर्जादायी पाळणा गीताने हजारो शिवभक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते.
निलंगेकरचा जल्लोष
गुलाब फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव,फटाक्यांची नयनरम्य अतिषबाजीने अवघे आकाश विविध रोषणाईने प्रकाशमान झाले होते.एकमेकांना मिठाई देऊन शिवजन्मोत्सवाचा आनंद द्विगुणित करून भव्य असा दिमाखदार सोहळा पार पाडण्यात आला.तसेच तुमचं आमचं नातं काय..जय जिजाऊ..जय शिवराय!यासारख्या वेगवेगळ्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता.
बालमावळ्यांनी शिवकालीन वेशभूषेत तलवारबाजीसह मर्दानी खेळ सादर केले.सर्व जाती-धर्माचे मावळे आणि महिला भगिनी या सोहळ्याला उपस्थित असल्याने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन या निमित्ताने घडले.
यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर,राष्ट्रवादीचे नेते पंडितराव धुमाळ,इस्माईल लदा फ,शिवसेनेचे नेते अविनाश रेशमे,विनोद अप्पा आर्य,ईश्वर पाटील,हरिभाऊ सगरे,प्रशांत वंजारवाडे,काँग्रेस नेते अभय साळुंके, हमीद शेख,अजित माने,युवक काँग्रेसचेअमोल सोनकांबळे, चक्रधर शेळके,अरविंद भातम्बरे,सुधाकरदाजी पाटील,युवासेनेचे दत्ता मोहोळकर,पंकज शेळके,धम्मानंद काळे,प्रकाश बाचके,अजित नाईकवाडे,वंचित चे सुनील सूर्यवंशी,देवदत्त सूर्यवंशी,संभाजी ब्रिगेडचे प्रमोद कदम,छावाचे दास साळुंके,मराठा सेवा संघाचे एम एम जाधव,बरमदे,व्यापारी अंबादास जाधव,लहुजी सेनेचे गोविंद सूर्यवंशी,गणराज्यचे रामलिंग पटसाळगे, रेखा पुजारी, दैवता सगर, महादेवी पाटील,मुजीब सौदागर,महेश देशमुख,अब्रार देशमुख,सुनील नाईकवाडे,शिवाजी पांढरे,असगर अन्सारी,अजय कांबळे,फारूक शेख,आयुब बागवान,तय्याब बागवान,सबदर कादरी इ सह हजारोच्या संख्यने महिलांची उपस्थिती होती.दापका वेस येथून निघालेली मिरवणूक सर्वांची लक्ष वेधीत होती.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे यांनी केले