• Fri. Aug 8th, 2025

जगभरातील बॉक्स ऑफिसवरचा शाहरुखचं बादशाह; ‘पठाण’ने पार केला 1000 कोटींचा टप्पा

Byjantaadmin

Feb 21, 2023

बॉलिवूडचा सुपरस्टार sharukh khan  ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ने आता जगभरात 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे शाहरुख खऱ्या अर्थाने जगभरातील बॉक्स ऑफिसवरचा बादशाह ठरला आहे. तर देशात या सिनेमाने 623 कोटींचा गल्ला जमवला आहे.

बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या ट्वीटनुसार, शाहरुख खानच्या ‘पठाण’ने रिलीजच्या 27 व्या दिवशी जगभरात 1000 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाच्या हिंदी वर्जनने 499 कोटी आणि साऊथमध्ये 17.97 कोटींची कमाई केली आहे. देशांतर्गत या सिनेमाने 623 कोटी आणि परेशात 377 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच जगभरात या सिनेमाने 1000 कोटींचा गल्ला जमवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *