छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सुशोभीकरण कामांसाठी १० लाखांचा निधी मंजूर.!
आ. अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने लामजना पाटी सुशोभीकरण होणार कामे .
औसा – लामजना पाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सोलर हायमास्ट व पथदिवे बसवून सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी शिवभक्तांनी व स्थानिक नागरिकांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे केली होती. याबाबत आ. अभिमन्यू पवार यांनी जिल्हा वार्षिक योजना निधीतून केलेल्या मागणीनुसार या कामासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून लामजना पाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सुशोभीकरण कामे केली जाणार आहेत.
३ नोव्हेंबर, २०२२ रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक सर्वसाधारण बैठकीत लामजना पाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सोलर हायमास्ट व पथदिवे बसवून सुशोभीकरण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने सदरील कामासाठी नाहरकत प्रमाणपत्र द्यावे व जिल्हा वार्षिक योजना निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली होती. शिवजन्मोत्सव १ दिवस अगोदर लामजना पाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सोलर हायमास्ट व पथदिवे बसवून सुशोभीकरण काम करण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजना निधी (सर्वसाधारण) २०२२-२३ विशेष अनुदान लेखाशिर्ष अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे.याव्यतिरिक्त उजनी, कासार सिरसी, आशिव, खरोसा, मातोळा व किल्लारी या मोठ्या गावांमधील कामांसाठी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे औसा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास निधीतून कामे पूर्ण होत असून विविध योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत.