शिवजंयतीनिमित्त ठाकरे गटाच्या नेत्या यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना भावनिक पत्र लिहित शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे.
ढोंगी कावळ्याच्या हस्ते तुमचा गौरव
छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, आम्हाला माफ करा. आज तुमच्या जन्मदिनी, स्वतःला मावळा म्हणणाऱ्या ढोंगी कावळ्याच्या हस्ते, वाद्याचं कातडं पांघरलेल्या धूर्त लांडग्यांच्या हस्ते, शिवसैनिक नाव लावणाऱ्या फितुराच्या हस्ते, किल्ले शिवनेरीवर तुमचा गौरव केला जातोय.
पुन्हा असा अधर्म घडणार नाही
पुढे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, तुमच्या हयातीत गद्दार ताठ मानेने फिरतोय. असे कधीही घडले नाही. पण ह्यापुढे पुन्हा कधी असा अधर्म घडणार नाही, असे वचन आम्ही तुम्हाला देतो. शिवश्रध्दा आणि शिवनिष्ठा मनी आहेच. फक्त ह्या गनिमांशी लढण्याचे बळ द्या. स्वराज्य पुन्हा स्थापन करण्याची ऊर्जा द्या आणि ह्या अधर्मयुध्दात विजयी होण्याचा आशीर्वाद द्या.