• Fri. Feb 6th, 2026

शारदा माता इंग्लिश स्कूल केळगाव मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

Byjantaadmin

Feb 18, 2023

शारदा माता इंग्लिश स्कूल केळगाव मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

निलंगा:-कोरोना महामारी मुळे दोन वर्ष शाळेत अनेक होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.मात्र यावर्षी मोठ्या उत्साहात शारदामाता प्री. प्राइमरी सेमी इंग्लिश स्कूल अँड कै. एस.के.पाटील प्रायमरी इंग्लिश स्कूल केळगाव तालुका निलंगा येथे आनंदमुनी विद्यालयाचे सचिव प्रकाश अट्टर्गेकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १७ रोजी मोठ्या उत्साहात पार पाडला.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटील,संस्थेच्या सचिव सौ रूपाली पाटील, अॅड.नारायण सोमवंशी,पत्रकार शिवाजी पारेकर,ज्ञानोबा काळे,गोविंद पाटील,दैनिक लोकमतचे पत्रकार जावेद मुजावर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या माध्यमातून ही शाळा नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते.शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत नियमितपणे वार्षिक स्नेहसंमेलन व विविध उपक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना कल्पकतेला वाव देत असते.
या कार्यक्रमात गणेश वंदना,छत्रपती शिवाजी महाराज, मा तुझे सलाम,सर्व धर्म समभाव नाटिका,मेरे पापा आश्या विविध गीतावर अभिनव आविष्कार दाखवला.कार्यक्रमाला पंचक्रोशीतील अनेक पालक,लहान मुले,गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार काळे,पद्मिनी गवारे,सारिका काळे,शारुख शेख,कालींदा सुतळे,बंडू सुतळे,रामजी काळे,श्रीधर काळे,राजपाल काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार काळे व राजपाल काळे यांनी केले तर आभार धनराज काळे यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *