होसुर येथे सर्वरोग निदान शिबिरआणि रक्तदानशिबिराने शिवजन्मोत्सवाची सुरुवात
तहसीलदार अनुप पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन
निलंगा /प्रतिनिधी:
तालुक्यातील होसुर येथे जि प के प्रा शाळा येथील प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनार जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत महा आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.प्रथमतः छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यामध्ये स्त्रीरोग, कान नाक घसा, बालरोग, त्वचा रोग, मणका विकार, नेत्र रोग, आस्तिरोग, या आजाराचे तज्ञ डॉक्टर्स या शिबिरात उपस्थित राहून असंख्य नागरिकांची विविध आजाराची तपासणी केली. या शिबिरात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर्वोपचार रुग्णांलया लातूर येथील तज्ञ् डॉक्टर उपस्थित होते.या विधायक सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन निलंगा तालुक्याचे तहसीलदार अनुप पाटील यांच्या हस्ते नव तरुणांनी रक्तदानही केले.
या मोफत आरोग्य शिबिरात सार्वजनिक शिवजन्मोत्सव संयमी होसूर येथील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन हे महाआरोग्य शिबीर यशस्वी केले.
बातमी चौकट:51रक्तदात्यांनी रक्तदान केले. होसूरसह परिसरातील 550 नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला त्यातील 30 नागरिकांना पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले
