- माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत
एक्स्पो २०२३ चे उद्घाटन, इस्लामपूर बिजनेस फोरमचा पुढाकार
तरुण तरुणींना उद्योजक व्यावसायिक बनण्याची सुवर्णसंधी -
लातूर प्रतिनिधी: सुशिक्षित बेरोजगार होतकरू तरुण तरुणींना उद्योग व्यवसायाकडे आकर्षित करून त्यांना यशस्वी उद्योजक व्यावसायिक बनविण्याकरीता इस्लामपूर फोरम(आयबीएफ) यांच्या वतीने आयोजित एक्स्पो – २०२३ उपक्रम कौतुकास्पद असून अशा उपक्रमाचे अनुकरण सबंध राज्यभरात होईल, असा विश्वास राज्याचे माजी
मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला आहे. इस्लामपूर येथील एक्स्पो २०२३ च्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार अमित
देशमुख बोलत होते. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष प्रतिक जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून आणि इस्लामपूर फोरम (आयबीएफ) यांच्या वतीने
शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी उद्योग व्यवसायाची आवड असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीना उद्योग व्यवसायाकडे आकर्षित करून आवश्यक
ते मार्गदर्शन मिळावे याकरिता एक्स्पो २०२३ चे आयोजन करण्यात आलेले होते .सदरील एक्स्पो २०२३ हे मा. जयंत पाटील खुले नाट्यगृह उरून- इस्लामपूर या
ठिकाणी चार दिवस चालणार आहे. यात २०० पेक्षा अधिक व्यावसायिक सदस्य सहभागी होणार असून ३६ पेक्षा अधिक मार्गदर्शन शिबिरे व विवीध
कार्यक्रमासह १० हजारहून अधिक व्यावसायिक उद्योजकांशी या माध्यमातून संपर्क घडवून आणला जाणार आहे. यावेळी बोलताना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले कि, सुशिक्षित,बेरोजगार होतकरू तरुण तरुणींना उद्योग व्यवसायाकडे आकर्षित करून त्यांना यशस्वी उद्योजक व्यावसायिक बनविण्याकरिता लागणारे आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य गरजेचे असून या करीता इस्लामपूर फोरम
(आयबीएफ) यांच्या वतीने आयोजित एक्स्पो २०२३ उपक्रम कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमाचे अनुकरण सबंध राज्यभरात होईल आणि अधिकाधिक तरुण तरुणी उद्योग व्यवसायाकडे वळतील असा विश्वास व्यक्त करीत या उपक्रमाबद्दल प्रतिक पाटील यांचे कौतुक करीत राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
शुभेच्छा दिल्या. या वेळी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर बिझनेस फोरम (आयबीएफ) यांच्या वतीने आयोजित
केलेल्या बिझनेस एक्स्पो २०२३ या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून नवोदित उद्योजकांना मार्गदर्शन केले.
पुढे बोलताना माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले कि, आपल्या भागातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करत आहेत, ही समाधानाची
बाब आहे. या तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम इस्लामपूर बिझनेस फोरमच्या माध्यमातून केले जात आहे. प्रतीक पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला, त्यासाठी त्यांना शुभेच्छा देत प्रत्येक महिन्याला ही तरुण मुले भेटतात आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित घडामोडींवर चर्चा करतात ज्यातून विचार मथंन होते. या प्रदर्शनात तरुणांनी आपल्या नवनवीन कल्पना सादर केल्या असून इस्लामपूरचे नागरिक, उद्योजक या प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद देत आहेत. या माध्यमातून केलेल्या प्रयत्नामुळे तरुण उद्योजकांना भविष्यात चांगले यश मिळेल याचा मला विश्वास आहे असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास विविध उद्योग व्यवसाय क्षेत्रातील नामांकित तद्न्यमंडळीनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या अभिनव उपक्रमास इस्लामपूरसह सांगली जिल्हा व आसपासच्या सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींनी मोठ्या संखेने उपस्थिती लावली होती.
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत एक्स्पो २०२३ चे उद्घाटन, इस्लामपूर बिजनेस फोरमचा पुढाकार
