• Tue. Aug 26th, 2025

जिल्ह्यात शिवजयंती दिनी मद्यविक्री बंद

Byjantaadmin

Feb 17, 2023

लातूर दि. 17 (जिमाका):* लातूर जिल्ह्यात दि.19 फेब्रुवारी, 2023 रोजी शिवजयंती (तारखेप्रमाणे) साजरी करण्यात येत असल्याने, सदर जयंती निमित्त मिरवणूका,मोटार सायकल रॅली व इतर सामाजिक कार्यक्रम खुल्या, मुक्त तसेच निर्भय वातावरणात, शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवणे आवश्यक आहे. कलम 142 नुसार तसेच नमुद कायद्याअंतर्गत केलेल्या विविध नियमानूसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून दि.19 फेब्रुवारी, 2023 रोजी संपूर्ण जिल्ह्याच्या सर्व किरकोळ मद्यविक्री अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सदर आदेशाची लातूर जिल्हयातील सर्व किरकोळ मद्यकिक्री अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुचराई करतील त्यांच्याविरूध्द मुंबई दारूबंदी कायदा 1949 व अनुषंगिक नियमांच्या अधारे कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद  घ्यावी असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *