सद्गुरु श्री सेवालाल महाराज आपल्या सर्वांसाठी अनुकरणीय
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
लातूर प्रतिनिधी: मानवतावादी क्रांतिकारी संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त लातूर एमआयडीसी परिसरात आयोजित केलेल्या कार्यक्रमास राज्याचे माजी
वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी
पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख पदाधिकाऱ्यासह उपस्थित राहिल, संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. बंजारा समाजाच्या वतीने प्रभाग ११ मध्ये क्रांतिकारी संत श्री सेवालाल
महाराज यांची जयंती साजरा करण्यात आली. यावेळी बोलतांना सद्गुरु श्री सेवालाल महाराज यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण संरक्षण, सेवाभाव या संदर्भाने दिलेली शिकवण आपल्या सर्वांसाठी अनुकरणीय असल्याचे नमूद करून त्यांचे कार्य कायम प्रेरणादायी राहील, अशी भावना याप्रसंगी माजी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली.यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को. ऑपरेटीव्ह बॅकेचे व्हा. चेअरमन समद पटेल, प्रदिप राठोड, गणेश देशमुख, प्रविण कांबळे, सुरेश चव्हाण, अशोक चव्हाण, बबलू चव्हाण, बळीराम चव्हाण, संतोष पवार, शरद राठोड, दयानंद राठोड आदी उपस्थित होते.