विविध व्यापारी व आस्थापना यांच्याकडे
एकल प्लास्टीक वापरत असल्याने रुपये 30 हजाराचा दंड
प्लास्टीकचा वापर करु नये, त्या ऐवजी कापडी पिशवीचा व कागदाचा वापर करावा
लातूर दि.3 (जिमाका):-तीन ऑक्टोबरच्या वृत्तपत्रात आलेल्या बातमीची उपमुख्यमंत्री कार्यालयाने गंभीर दखल घेऊन तात्काळ अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. त्या अनुषंगाने जिल्हा सह आयुक्त रामदासजी कोकरे जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांनी दिलेल्या निर्देशानुसार निलंगा शहरात सिंगल युज प्लास्टिक वापराबाबत नगरपरिषदे मार्फत नियुक्त करण्यात आलेल्या पथकांनी तपासणी केली असता विविध व्यापारी व अस्थापना यांच्याकडे एकल वापर प्लास्टिकचा वापर करत असल्याचे आढळून आल्याने त्यांना रुपये 30 हजार दंड आकारण्यात आला.
तरी निलंगा शहरातील व्यापारी फेरीवाले व इतर आस्थापना यांना कळविण्यात येते की त्यांनी प्लास्टिकचा वापर करू नये, या ऐवजी कापडी पिशवीचा व कागदाचा वापर करावा असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.