निलंग्यात शिवजयंती निमित्त व्याख्यान
निलंगा:-येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमिताने “मी जिजाऊ बोलते” हे व्याख्यनपुष्प अयोजित करण्यात आले आहे.या व्याखानाला प्रमुख व्याख्याते सौ. नंदाताई पाटील हे उपस्थित राहणार आहेत तर या व्याख्यान कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर (माजी खासदार लातुर)उपस्थित राहणार आहेत.
या व्याखानाचे उदघाटन शोभाताई जाधव(उपविभागीय अधिकारी निलंगा)यांच्या हस्ते होणार आहे.
सौ.डॉ. गीताताई देशमुख, सौ.सरस्वतीताई नागमोडे, सौ.अर्चनाताई जाधव,डॉ. विद्याताई देशमुख,डॉ. वैशालीताई हातागळे,सौ. कविताताई तोष्णीवाल,सौ. उर्मिलाताई माने,सौ.राजश्रीताई शिंदे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.
सदरील व्याख्यान हे दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर संस्कृतीक सभागृहात (टाऊन हॉल) निलंगा होणार आहे . तरी या व्याखानाला महिला भागिनी मोठ्या संख्याने उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक शिवजयंती समिती तर्फे करण्यात आले आहे.