बेंडगा ग्रामपंचायत राबवणार सुकन्या अन् कन्यादान योजना…
महिला सरपंचानी केली ग्रामसभेत घोषणा तालुक्यातील पहिल्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
निलंगा(प्रतिनिधी)नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत नव्याने निवडून आलेल्या नुतन सरपंच मोहरबाई तात्याराव धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या पहिल्याच ग्रामसभेत आपले पती आदर्श शिक्षक कै. तात्याराव कडाजी धुमाळ यांच्या स्मरणार्थ खा.रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या नावाने गावात जन्मलेल्या मुलीसाठी सुकन्या योजना तर कर्मयोगी डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नावाने कन्यादान योजना वैयक्तिक स्तरावर राबवणार असल्याची घोषणा नुतन सरपंच मोहरबाई धुमाळ यानी केल्याने सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे.
निलंगा तालुक्यातील बेंडगा हे गाव उच्च शिक्षित व शांतता प्रिय असून आतापर्यंत या गावात अनुचित प्रकार घडला नाही.या गावची लोकसंख्या १ हजार सातशे असून सात सदस्य व एक सरपंच असे एकून आठ लोकांची ग्रामपंचायत आहे.माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे विस्वासू समजले जाणारे सत्यवान तात्याराव धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली बहूमताने पॕनलचा विजय झाला.त्यानंतर गावात दिनांक १० रोजी सकाळी १० वाजता घेण्यात आलेल्या ग्रामसभेत वेगवेगळ्या स्तुत्य उपक्रमाची घोषणा सरपंचाने केली.या ग्रामसभेत गावात १ जानेवारी २०२३ पासून पुढील पाच वर्षे गावात जन्मलेल्या मुलीसाठी माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर या नावाने सुकन्या योजना राबवून त्या मुलीच्या नावे ११ हजार रूपये ठेव ठेवण्याचा संकल्प केला तर कर्मयोगी डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नावाने गावातील कन्यादान होणाऱ्या प्रत्येक मुलीला संसार उपयोगी साहित्याचा आधार व्हावा म्हणून ११ हजार रूपयांचे साहित्य कन्यादान स्वरूपात देण्यात येणार आहे.
सध्या ग्रामीण भागात चो-यांचे प्रमाण वाढले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये व गावची सुरक्षितता आबाधित रहावी यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी व मुख्य रस्त्यावर २४ सी.सी.टी.व्ही कॕमेरे लावण्याचा ठराव घेतला यापुढे संपूर्ण गाव २४ तास २४ कॅमेऱ्याच्या
नजरकैदेत राहणार आहे.त्याच बरोबर केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून गावचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी गाव अंतर्गत रस्ते,विद्युतीकरण,शेत रस्ते,गावचे मुख्य प्रवेशद्वार करण्याचा निर्णय जाहिर करून जलसंधारण विभागाकडून जलयुक्त शिवार ही योजना गावच्या पूर्वेकडील नाला चार किलोमीटर खोलीकरण सरळीकरण करण्यात येणार आहे.गोवर्धन योजनेच्या माध्यमातून गावात गोबर गॕस बांधण्यात येणार असून गावातील नागरिकांना मोफत स्वंयपाकासाठीचा गॕस देण्यात येणार असल्याची माहिती सत्यवान धुमाळ यानी दिली आहे.
यावेळी उपसरपंच वैजनाथ तळभोगे ग्रा.प.सदस्य प्रमोद पाटील,श्रीमंत धुमाळ,छायाबाई गीरी,पार्वतीबाई सुर्यवंशी,उषाबाई धुमाळ,सुरेखा जगताप,मंगलबाई धुमाळ यासह चेअरमन शिवाजी धुमाळ तंटामुक्ती अध्यक्ष मधूकर धुमाळ,अनंत धुमाळ,माजी सरपंच ओमगीर गीरी,प्रकाश धुमाळ,अनंत धुमाळ,अंगद सोळुंके अदी उपस्थित होते.या निर्णयाचे संपूर्ण गावातील नागरिकांनी स्वागत केले आहे.