• Wed. Apr 30th, 2025

इंदिरा महिला नागरी सहकारी बँक अध्यक्षपदी ऍड. सौ.सविता मोतीपवळे उपाध्यक्षपदी सौ.कौशल्यादेवी लड्डा यांची निवड

Byjantaadmin

Feb 8, 2023

 

इंदिरा महिला नागरी सहकारी बँक अध्यक्षपदी ऍड. सौ.सविता मोतीपवळे उपाध्यक्षपदी सौ.कौशल्यादेवी लड्डा यांची निवड

लातूर:-इंदिरा महिला नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अड सौ .सविता ओमप्रकाश मोतीपवळे व उपाध्यक्षपदी सौ. कौशल्यादेवी सत्यनारायणजी लड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

इंदिरा महिला नागरी सहकारी बँकेची सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी सहकार विभाग निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला ह्यामध्ये सर्व संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून सहायक निबंधक अशोक कदम यांनी निवडणूक प्रक्रिया राबवली.त्यांना श्री शेख नबी सहकार अधिकारी श्रेणी २ यांनी सहाय्य केले. नूतन संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी श्री अशोक कदम यांच्या अक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते अध्यक्ष अॅड सौ .सविता ओमप्रकाश मोतीपवळे व उपाक्षसी कौशल्यादेवी सहानारायणजी लहा यांची निवड करण्यात आली संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये श्रीमती अलका रामगोपाल सारडा, सौ शांताबाई आण्णासाहेब पाटील, अॅड सविता मोतीपवळे, सौ विजया सावळे, सौ शकुंतला पालापुरे श्रीमती विभावरी कस्तुरे, सौ अरुणा गुणगुणे, श्रीमती सुमन गंभीर, सौ आशा राजेंद्र गिरी, सौ सरस्कृत मळभागे, सौ संगीता मन्मथ पंचाक्षरी, श्रीमती मंगल मधुकर पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *